मुंबई : गळणाऱ्या केसांमुळे बहुतांश लोक त्रस्त असतात. ( How to control Hair fall ) केस गळणे कसे नियंत्रित करावे ही समस्या इतकी सामान्य झाली आहे की ती प्रत्येक माणसामध्ये आढळते. आवळा केसांसाठी किती फायदेशीर आहे. याविषयी खूप कमी जणांना माहीत आहे. जर तुम्ही सर्व काही करून बघितले असेल पण काही फायदा होत नसेल तर बदामाचे तेल आणि आवळा एकदा नक्की ट्राय करून पाहा. ( Home remedies for hair fall control ) हा एक केसगळती नियंत्रणासाठी घरगुती उपाय आहे. ज्याचा वापर केल्याने तुमचे केस गळणे थांबेल आणि त्यासोबत नवीन केसही वाढू लागतील.
बदाम तेल : 1-2 चमचे बदाम तेल ( Almond oil for Hair fall ) कोमट करा आणि संपूर्ण डोक्यावर लावा. काही मिनिटे आपल्या बोटांनी डोक्याला हळूवारपणे मसाज करा. केसांच्या टोकालाही थोडेसे तेल लावा. रात्रभर तेल डोक्यावर आणि केसांवर तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शाम्पूने धुवा. यावेळी जास्त शॅम्पू लावण्याची गरज नाही. काहींना शॅम्पू जास्त वापरण्याची सवय असते. आपण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा उपाय ट्राय करू शकता
बदामाचे तेल आणि कांदा : एक मध्यम आकाराचा कांदा घ्या. तो किसून त्याचा रस काढा. एका भांड्यात कांद्याचा रस काढा. त्यात दोन चमचे बदामाचे तेल घालून मिक्स ( Almond oil and onion ) करा. हे मिश्रण केसांवर आणि डोक्यावर लावा आणि हलक्या हातांनी काही मिनिटे चांगले मसाज करा. 30-40 मिनिटे केसांवर राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. आपण आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा हा उपाय करू शकता.
बदाम तेल आणि लिंबाचा रस : एका भांड्यात २ चमचे बदामाचे तेल घ्या आणि त्यात २ चमचे ताजे लिंबाचा रस ( Almond oil and lemon juice ) घाला. ते एकत्र मिसळा आणि संपूर्ण डोक्यावर तसेच केसांना लावा. तुमच्या बोटांनी, डोक्याला 5-6 मिनिटे मसाज करा आणि नंतर 20-30 मिनिटे ते तेल तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने केस धुवा. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय करू शकता.
बदाम तेल आणि आवळा : एक चमचा आवळा पावडर घेऊन त्यात आवश्यक प्रमाणात बदाम तेल मिसळला आणि त्याची पेस्ट ( Almond oil and amla powder ) बनवा. ती पेस्ट तुमच्या डोक्यावर लावा. तुमच्या बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. तासभर तेल आणि पेस्ट तशीच डोक्यावर राहू द्या. त्यानंतर शाम्पूने डोके धुवा. तुम्ही हा मास्क आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा वापरू शकता.