मुंबई - माजी मंत्री नवाब मलिक ( Former minister Nawab Malik ) यांच्या किडनीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, ईडीने नवाब मलिक यांच्यावरील उपचारांची तपशीलवार माहिती घेण्यासाठी विशेष टीम तयार करण्याची मागणी केली होती. या संदर्भात न्यायालयाने नवाब मलिक यांच्या किडनीची तपासणी करून सत्र न्यायालयाला ( Mumbai Sessions Court ) अहवाल सादर आदेश जेजे रुग्णालयातील तज्ञ डाॅक्टरांना दिले आहेत.
उपचाराबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश - नवाब मलिक यांचा आज जामीनाकरिता दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यानंतर त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी ईडीच्यावतीने करण्यात आली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून नबाब मलिक यांच्यावर खाजगी कुर्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र, नबाब मलिक यांच्या वकिलांनी विरोध केला असता जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर या संदर्भातील अहवाल सत्र न्यायालयात सादर करतील असे निर्देश न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आज दिले आहे. या निर्णयाला नवाब मलिक यांच्या वकिलांनी कडून देखील मान्य करण्यात आले आहे.
मलिक यांची किडनी खराब - नवाब मलिक यांची एक किडनी मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. तर दुसरी किडनी देखील काही प्रमाणात खराब झाली आहे. त्यामुळे त्यांना दुसरे देखील आजार उद्भवत आहे, असे मलिक यांच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितले. जे जे रुग्णालयातील डॉक्टर यावर सविस्तर अहवाल सादर केल्यानंतर ईडीने केलेली विशेषज्ञ डॉक्टरांच्या टीम गठीत करण्यावरील अर्जावर देखील न्यायालय नंतर निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आले आहे.