ETV Bharat / state

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी मुंबई पोलीस खात्यात विशेष बदल - corona news from mumbai

मुंबई पोलीसमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांच्या कामकाजामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

फोटो सौ. ट्वीटर
फोटो सौ. ट्वीटर
author img

By

Published : Apr 30, 2020, 11:50 AM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून दररोज शेकडो रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई शहरात 22 मार्च पासून संचारबंदी लागू असून कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी मुंबई पोलीस हे 24 तास रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांत 3 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना संक्रमानामुळे मृत्यू झाल्याने पोलीस विभागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मुंबई पोलीस खात्यात 40 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मृत्यू पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वय हे 50 वर्षांपेक्षा अधिक असल्याने यावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस खात्यात काही उपाययोजना करण्यात आले आहेत.

कामाच्या वेळात बदल, 55 वय असलेल्या पोलिसांना घरी थांबण्याचे आदेश

मुंबई पोलीस खात्यात 55 वय पार केलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना घरी थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांचे वय 52 किंवा जास्त व मधुमेह, हायपर टेंशन सारखे आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा घरी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे निर्माण होणाऱ्या पोलीस बळाच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबईतील 94 पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या आहे. बारा तासांचे कर्तव्य पार केल्यानंतर 24 तासांची सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर तब्बल 12 हजार पोलीस कर्मचाऱ्यांना डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हाड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. 20 हजार कर्मचाऱ्यांना मल्टिविटॅमिन व प्रोटीनचा पुरवठा करण्यात आला आहे.

कोरोना संक्रमित पोलिसांसाठी विशेष रुग्णालय

कोरोना संक्रमित पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी विशेष रुग्णालय स्थापित करण्यात आले असून प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विशेष खाट राखीव ठेवण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी विशेष हेल्प लाईन सुरु करण्यात आली आहे. याद्वारे संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या कोरोनाबाबत असणाऱ्या शंकांचे निरासरन करुन योग्य वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

मुंबई पोलीस खात्यातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना पीपीई किट, मास्क, हॅन्ड सॅनिटायजर, हातमोजे यांसारख्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. मुंबईत विविध ठिकाणी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून मंडप उभारण्यात आले आहे. तसेच जेवणाची पाकीट, गरम पाणी व इतर गोष्टी पोलिसांना पुरविण्यात आले आहेत. याबरोबरच प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला 50 लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.

हेही वाचा - मुंबईत प्रभागनिहाय 'कम्युनिटी किचन' सुरु करा - पालकमंत्री अस्लम शेख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.