मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) ड्रग्ज सिंडिकेटचा तपास केला जात आहे. यात रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि हाऊसकिपिंग कर्मचारी दीपक सावंत व जैद यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मेडिकल टेस्टसाठी रुग्णालयात नेले आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एनसीबीने आतापर्यंत पाच अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक याचे अमलीपदार्थ तस्कर, विक्रेत्यांसोबत संबंध स्पष्ट झाल्याचा दावा एनसीबीने केला होता. त्याची चौकशी केल्यानंतर शोविक चक्रवर्ती, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि हाऊसकिपिंग कर्मचारी दीपक सावंत व जैद यांना ४ सप्टेंबरला यांना अटक केली होती. न्यायालयाकडून त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबी कोठडी मिळाली होती. आज ही कोठडी संपत असून त्यांच्या रिमांडसाठी पुन्हा एकदा एनसीबीकडून न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला जाणार आहे.