ETV Bharat / state

लसींचा तुटवडा, मुंबईत आज व उद्या लसीकरण बंद - TODAY AND TOMORROW VACCINATION CLOSED

मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे अनेकवेळा लसीकरण बंद ठेवावे लागले आहे. शनिवार १५ आणि उद्या रविवार १६ मे असे दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर जाऊन गर्दी करू नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

मुंबईत लसीकरण नाही
मुंबईत लसीकरण नाही
author img

By

Published : May 15, 2021, 9:38 AM IST

Updated : May 15, 2021, 9:57 AM IST

मुंबई - मुंबईमधील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे अनेकवेळा लसीकरण बंद ठेवावे लागले आहे. शनिवार १५ आणि उद्या रविवार १६ मे असे दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर जाऊन गर्दी करू नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.

दोन दिवस लसीकरण बंद
दोन दिवस लसीकरण बंद

लसीकरण मोहीम ...
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण केले जात आहे. मुंबईत महापालिकेचे १५३, सरकारचे २० आणि खासगी ७४ अशा एकूण २४७ केंद्रावर लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत २८ लाख ४१ हजार ३४९ लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यात २ लाख ९८ हजार ७६३ आरोग्य कर्मचाऱ्यांना, ३ लाख ५६ हजार ०९८ फ्रंट लाईन वर्करना, ११ लाख ३३ हजार ६२८ जेष्ठ नागरिकांना, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना १० लाख ४ हजार १११ तर १८ ते ४४ वयामधील नागरिकांना ४८ हजार ७५० लसींचे डोस देण्यात आले आहेत.

लसींचा तुटवडा
लसींचा तुटवडा

लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 23 हजार 924 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 11 हजार 353 लाभार्थ्यांना पहिला तर 12 हजार 571 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 28 लाख 41 हजार 349 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 21 लाख 21 हजार 573 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 19 हजार 776 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 98 हजार 762 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 56 हजार 098 फ्रंटलाईन वर्कर, 11 लाख 33 हजार 628 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 10 लाख 4 हजार 111 तर 18 ते 44 वर्षामधील 48 हजार 750 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

४५ वयावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य -

मुंबईत रोज ३० हजार ते ५० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्याकडून लसीचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीचा तुटवडा असल्याने लसीचा मुबलक साठा येई पर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण आणि दुसरा डोस असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे.

दोन दिवस लसीकरण बंद -

लसीचा साठा नसल्याने आज (शनिवार) व उद्या रविवारी सर्व केंद्रावरील लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. लसीचा साठा आल्यावर सोमवार पासून लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील माहिती मिळेपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,98,762
फ्रंटलाईन वर्कर - 3,56,098
जेष्ठ नागरिक - 11,33,628
45 ते 59 वय - 10,04,111
18 तर 44 वय - 48,750
एकूण - 28,41,349

Last Updated : May 15, 2021, 9:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.