ETV Bharat / state

'जखमी शेरनी मैदानात एकटी उतरून लढली, ऐतिहासिक विजय मिळवला'

जनतेने कोणाच्या दबावात येऊन मतदान नाही केलं पश्चिम बंगाल निकाल हा पाहिला तर लोकतंत्र अमर आहे याची प्रचिती येते.आणखी लोकांना प्रेरणा मिळेल आणि त्याच्या मशालीचा प्रकाश सगळीकडे पसरेल.एक स्त्री, जखमी शेरनी मैदानात एकटी उतरून लढली ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला, असेही राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : May 2, 2021, 6:59 PM IST

मुंबई - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ममता दीदी यांच्या तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या विजयानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ममतादीदींचे कौतुक केले आहे. बंगालची शेरनी ममता दीदीला आम्ही शुभेच्छा देतो. पश्चिम बंगालच्या जनतेला शुभेच्छा, जनतेने कोणाच्या दबावात येऊन मतदान नाही केलं पश्चिम बंगाल निकाल हा पाहिला तर लोकतंत्र अमर आहे याची प्रचिती येते.आणखी लोकांना प्रेरणा मिळेल आणि त्याच्या मशालीचा प्रकाश सगळीकडे पसरेल.एक स्त्री, जखमी शेरनी मैदानात एकटी उतरून लढली ऐतिहासिक विजय त्यांनी मिळवून दिला,असेही राऊत यांनी सांगितले आहे.

'दिल्लीवरून येऊन दादागिरी चालणार नाही'

केंद्राचा दबाव, सगळीकडून दबाव, सगळीकडे त्यांच्याच लोकांना विरोधात उभे केल्या तरी त्या लढल्या. निवडणुकीत हार-जीत होते केंद्राने पूर्ण यंत्रणा लावली.मोठे लोक, मुख्यमंत्री, केंद्र शासन सगळे दीदीच्या विरोधात होती.मोठी सभा, रॅली, पैशांचे वाटप केले तरी बंगालच्या जनतेने दीदी यांना निवडले देशात कोरोना संकट असून प्रोटोकाल तोडून ते वावरले. देश कोरोनाशी लढतोय आणि भाजपा ममताशी लढत होते. ममता दीदीने स्पष्ट केलं की दिल्लीवरून येऊन दादागिरी चालणार नाही.जनता सगळे ठरवते की कोणाला निवडायचेआहे.

खासदार संजय राऊत
'मोदी आणि अमित शाह अजिंक्य नाहीत'

बेळगावात एकीकरणचा उमेदवार जरी मागे असला तरी सर्व एक झाले हे महत्त्वाचे,पुढच्या निवडणुकीची ही आमची तयारी आहे. बंगालमध्ये जे कृत्रिम वादळ केल देशात महामारी संकट असताना पंतप्रधान, गृहमंत्री तळ ठोकून बसलेले होते. हे त्या परिस्थितीत योग्य नव्हते. कोरोनाला वाऱ्यावर सोडूनही तिथे गेले. तिथे त्यांना विजय मिळवता आला नाही, पण कोरोना सगळीकडे पसरला. कोणी दबाव टाकला तरी काही होणार नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. देशाचे महत्त्वाचे नेते तळ ठोकून बसले म्हणजे त्यांचा अस्थित्व धोक्यात आहे. ममता दीदी यांच्याकडे आता राष्ट्रीय राजकारणातील चेहरा म्हणून पहात आहे. देशाला संकटात ठेऊन निवडणूक जिंकायला भाजपाकडून पंतप्रधानांना उतरावे लागले हे दुर्दैव. ममता दीदी यांच्या जिंकण्यावर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. निवडणुकांमध्ये प्रत्येकाचे तंत्र मंत्र असतात त्या परीने ते लढले. प्रत्येकाची ती स्टेटर्जी असते ममता बॅनर्जीने संदेश दिला आहे, देशात मोदी आणि अमित शाह अजिंक्य नाही, त्यांनाही हरवलं जाऊ शकते. असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

'पंढरपुराचा निकाल हा महाराष्ट्राचा गणित बदलणारा नाही'

पंढरपुरात फडणवीस यांनी काहीही म्हटले तरी पंढरपुराचा निकाल हा महाराष्ट्राचा गणित बदलणारा नाही. काही गणित असतात त्यात महाविकास आघाडीचा पराभव झाले आहे.

हेही वाचा -'पुद्दुचेरी आणि तामिळनाडू वगळता कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.