ETV Bharat / state

मुंबई महापालिकेच्या ‘बालकोत्सवा’ला शिवसेनाप्रमुखांचे नाव - मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी गाणी, नृत्य, संगीताच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड स्तरावर पालिका बालकोत्सव स्पर्धा आयोजित करते. या ‘बालकोत्सव’ सोहळ्याला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नाव द्यावे अशी ठरावाची सूचना तत्कालीन शिवसेना नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी मांडली होती.

Shiv Sena chief's name for BMC 'Balkotsava'
मुंबई महापालिकेच्या ‘बालकोत्सवा’ला शिवसेनाप्रमुखांचे नाव
author img

By

Published : Jun 22, 2021, 7:24 AM IST

मुंबई - पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी बालकोत्सव साजरा केला जातो. या सोहळ्याला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नाव देण्याची शिवसेनेचे नगरसेवक अरुण दुधवडकर यांची मागणी पालिका आयुक्तांनी मंजूर केली आहे.

काय होती ठरावाची सूचना -

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी गाणी, नृत्य, संगीताच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड स्तरावर पालिका स्पर्धा आयोजित करते. यामध्ये प्रत्येक शाळा, नंतर वॉर्ड आणि नंतर जिल्हा स्तरावर ही स्पर्धा होते. यानंतर अंतिम भव्य प्रदर्शन सोहळाही होतो. या ‘बालकोत्सव’ सोहळ्याला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नाव द्यावे अशी ठरावाची सूचना तत्कालीन शिवसेना नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी मांडली होती. बाळासाहेबांना सिने-नाट्य कला सृष्टीतील कलावंतांबद्दल आस्था व प्रेम होते. अशा थोर व्यक्तीच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी बालकोत्सवाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नामकरण करण्यात यावे असे दुधवडकर यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले होते.

आयुक्तांचा अभिप्राय -

दुधवडकर यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. ही ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर करून पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आली होती.याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कलाकार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात व्यंगचित्रांच्या माध्यमातून केली होती. समाजातील विविध घटकांकडे ते कलाकाराच्या नजरेने पाहत. सिने, नाट्य, कला सृष्टीतील कलावंतांबद्दल त्यांना आस्था व प्रेम होते. त्यांच्या या कलासक्त कार्याचे महत्त्व मुलांमध्ये रुजविण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची आठवण म्हणून बालकोत्सवाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ हे नाव देणे संयुक्तिक ठरेल, असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

हेही वाचा - नवी मुंबई विमानतळाला 'स्व. बाळासाहेब ठाकरे' नाव देण्याला भाजपाचा विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.