ETV Bharat / state

अखेर मुहूर्त ठरला, जुलै महिन्यात होणार शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाचे भूमीपूजन

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुचर्चित स्मारकाचे भूमिपूजन जुलै महिन्यात होणार आहे. शिवाजी पार्क येथील मुंबई महापौर बंगल्याच्या परिसरात हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

महापौर बंगला परिसर
author img

By

Published : Jun 5, 2019, 11:39 AM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुचर्चित स्मारकाचे भूमिपूजन जुलै महिन्यात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्य उपस्थितीतील एका उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाजी पार्क येथील मुंबई महापौर बंगल्याच्या परिसरात हे स्मारक उभारण्यात येणार आहे.

mayer residental area
महापौर बंगला परिसर
लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेमुळे स्मारकाच्या प्रशासकीय बाबी रखडल्या होत्या. मात्र आता महिनाभरातच एमएमआरडीए टेंडर प्रक्रिया पूर्ण करणार असून जुलै महिन्यात भूमिपूजन करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या बांधकामाला सुरवात होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्तिथीत जमीन हस्तांतराचा करार करून स्मारकाची जमीन विश्वस्तांच्या ताब्यात देण्यात आली होती. तसेच या जागेवर हेरिटेज वस्तूला कोणताही धक्का न पोहोचविता स्मारक उभारले जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उच्च स्तरीय बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या.

असे असणार स्मारक
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरमधील महापौर बंगल्याच्या परिसरात अंडरग्राऊंड असणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडे आहेत. ही झाडे न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारल्या जाणार आहे. नऊ हजार स्क्वेअर फूट जागेत हे स्मारक तयार करण्यात येईल. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रं, बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रं लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल या वास्तू ही बंगल्याच्या खालीच तयार करण्यात येणार आहेत.

Intro:विधानसभेच्या तोंडावर शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाचा मुहूर्त , जुलै महिन्यात होणार भूमिपूजन.

मुंबई 5

शिवसेना आणि भाजपच्या विधानसभा जागावटपाच्या प्रश्न ऐरणीवर असतानाच येन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुचर्चित स्मारकाचे भूमिपूजन जुलै महिन्यात करण्याचा निर्णय उच्च स्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील मुंबई महापौर बंगल्याच्या परिसरात हे स्मारक होणार आहे. त्या परिसरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्तिथीत एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्तिथीत जुलै महिन्यात स्मारकाच्या भूमीपूजनाचा निर्णय घेण्यात आला .
लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेमुळे स्मारकाच्या प्रशासकीय बाबी रखडल्या होत्या. मात्र आता लवकरच टेंडर प्रक्रिया एमएमआरडीए महिनाभरातच पुर्ण करणार असून जुलै महिन्यात भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला सुरवात होणार आहे.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्तिथीत जमीन हस्तांतरांचा करार करून स्मारकाची जमीन विश्वस्तांच्या ताब्यात देण्यात आली होती. तसेच या जागेवर हेरिटेज वस्तूला कोणताही धक्का न पोहचवता स्मारक उभारले जाणार असल्याचे एमएमआरडीए कडून स्पष्ट करण्यात आले होते.
हे अंडरग्राऊंड स्मारक बांधलं जाणार आहे. हेरिटेज समितीने अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडं आहेत. ही झाडं न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारण्यात येणार आहे. नऊ हजार स्क्वेअर फूट जागेत हे स्मारक तयार होणार आहे. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रं, बाळासाहेबांनी रेखाटलेली व्यंगचित्रं लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल या वास्तू ही बंगल्याच्या खाली अस्तित्वात येणार आहेत.Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.