ETV Bharat / state

रामाची वर्गणी...! मंदिराचे राजकारण करणाऱ्या भाजपवर शिवसेनेची टीका - सामनातून भाजपवर टीका

रामाचे मंदिर निर्मिती ही देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यासाठी जगभरातील हिंदूनी या आधीच तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य होणार आहे. या कामासाठी ४ लाख स्वयंसेवकांची नियुक्ती केली त्यांची मुख्य संघटना कोणती आहे. हे स्पष्ट झाले तर चांगले होईल, असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे.

scf
मंदिराचे राजकारण करणाऱ्या भाजपवर शिवसेनेची टीका
author img

By

Published : Dec 21, 2020, 9:15 AM IST

Updated : Dec 21, 2020, 11:54 AM IST

मुंबई - राम मंदिराच्या नावाने वर्गणी मागून कोणता पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे, असा प्रश्न विचार शिवसेनेने मुखपत्र सामनामधून अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी प्रत्येक हिंदू कुटुंबाकडून वर्गणी घेतली जाणार आहे. यासाठी जवळपास चार लाख स्वंयसेवक देशभरात फिरुन हा निधी गोळा करणार आहेत. मात्र, या स्वयंसेवकांची नियुक्ती कोणी केला? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माण करण्यास परवानगी दिली आहे, मग आता तरी त्यावरून राजकारण करणे बंद करायला हवे, असा सल्लाही शिवसेनेने भाजपाला दिला आहे.

रामाची वर्गणी-

अयोध्येतील राम मंदिर निर्माण करण्यासाठी मकर संक्रांतीपासून वर्गणी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. १४ जानेवारीला मकर संक्रांतीला चार लाखाहून अधिक स्वयंसेवक १२ करोड कुटुंबांना भेट देणार आहेत. हे स्वयंसेवक प्रत्येक गावात जाणार आहेत, असे विश्व हिंदू परिषदेने जाहीर केले आहे. विहिंपचे चंपत राय हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव आहेत. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधिश पदावरून सेवा निवृत्त झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार झालेले रंजन गोगाई यांनी राम मंदिराचा स्पष्ट निकाल दिला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिर निर्मितीच्या कामाचा शुभारंभ देखील केला. मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. अर्थात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तंबूमध्ये असलेले प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान होतील. असे असताना आता वर्गणी गोळा करण्यासाठी आता मजेदार टोळी बनवली असल्याची टीका केली आहे.

वर्गणी गोळा करणाऱ्यांची संघटना कोणती?

राम मंदिर निर्मितीसाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंदिर निर्माण करण्यासाठी निधीची चिंता करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. तसेच मर्यादा पुरषोत्तम रामाचे मंदिर निर्मिती ही देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यासाठी जगभरातील हिंदूनी या आधीच तिजोऱ्या रिकाम्या केल्या आहेत. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य होणार आहे. या कामासाठी ४ लाख स्वयंसेवकांची नियुक्ती केली त्यांची मुख्य संघटना कोणती आहे. हे स्पष्ट झाले तर चांगले होईल. मात्र, जर मंदिरासाठी वर्गणी गोळा करण्यासाठी हे स्वयसेवक एखाद्या पक्षाचे प्रचारक म्हणून घरोघरी जात असतील तर हा राम मंदिरासाठी रक्त सांडलेल्यांच्या आत्म्याचा अपमान करण्यासारखे होईल.

मंदिर निर्मितीसाठी लागणारे ३०० कोटी आधीच जमा झालेत-

मंदिराची लढाई राजकीय लढाई नव्हती ती एक हिंदूत्वाची भडकलेली ठिणगी होती. आज भाजपा त्याच आगीवर आपली भाकरी भाजत आहे. मात्र, याचे आम्हाल दुख नाही,कारण शिवसेनेने यापूर्वीच राम मंदिर निर्माणासाठी कोटी रुपयांचा निधी सर्वात आधी रामलल्लाच्या बँक खात्यात जमा केले आहेत. त्यासाठी रामाचे बँकेत खाते उघडण्यात आले आहे आणि जगभरातून त्यामध्ये मदत दिली जात आहे. मंदिर निर्मितीसाठी लागणारा ३०० कोटी निधी रामाच्या खात्यात जमाही झाला आहे. तसेच बाबरीचा घुमट पाडल्यानंतर अयोध्येत विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हजारों शिळाचे कामही पूर्ण झाले आहे. यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करायला हवे तेवढे कमीच आहे.

राम मंदिर म्हणजे मालकी हक्काचा विषय ठरत चाललाय-

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून बाबरीवर हातोडा चालवला गेला. हा इतिहास आहे. मात्र आज अयोध्येतील राम मंदिर म्हणजे मालकी हक्काचा विषय होत चालला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली आणि त्यामध्ये अनेक संत-महात्म्यांची नियुक्ती मोदी सरकार केली आहे. त्या सर्व आपल्या-आपल्या लोकांच्याच करण्यात आल्या आहेत. त्यावरून टीकाही झाली. मात्र, या संत महात्म्यांनी आधी मंदिराचे काम तातडीने पूर्ण करून हा राजकीय मुद्दा संपवायला हवा.

कारसेवक काय प्रसाद खायला गेले नव्हते-

पहिल्यांदा मंदिर तिथेच बांधू आणि आता मंदिर आम्हीच बांधले, असे जे दावे केले जात आहेत. ते कशासाठी? असे असेल तर ज्या कारसेवकांनी बलिदान दिले होते ते काय तिथे प्रसाद खायला की शरयू नदीमध्ये अभंग्य स्नान करायला गेले होते. अयोध्येत लोकवर्गणीत भव्य राम बांधायचे असे काही ठरले नव्हते. मात्र, लोकांकडून वर्गणी गोळा करणे हे मुद्दा साधारण नव्हता. या मागे राजकारण आहे. राम अयोध्याचा राजा होता. त्यांच्या मंदिरासाठी लढाया झाल्या, शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले आहे. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर लोकवर्गणीतून बांधायचे?

हिंदूत्वाच्या अस्मितेची पताका फडकवण्यासाठी राममंदिराची निर्मिती -

मुळात म्हणजे श्रीरामाचे मंदिर कोण्या एका राजकीय पार्टीच्या हितासाठी बांधले जात नाही तर देशाच्या हिंदूत्वाच्या अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात आहे. मात्र, मंदिरासाठी वर्गणी गोळ्या करण्याच्या अभियानातून हे संपर्क अभियान राबवले जाणार आहे. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आडून २०२४च्या निवडणुकीचा प्रचार आहे. रामाच्या नावाने सुरू असलेला राजकीय प्रचार थांबला पाहिजे. मंदिर निर्मितीनंतर निवडणूक प्रचारामध्ये राम नाही तर विकासाचे मुद्दे यायला हवेत. मात्र, असे दिसून येत नाही. वनवास संपल्यानंतरही श्रीरामाच्या अडचणी अजूनही सुरूच आहेत.

Last Updated : Dec 21, 2020, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.