ETV Bharat / state

Shiv Sena SC Hearing : एकच व्यक्ती दोन आघाड्यात उपमुख्यमंत्री होते, या राजकारणात कोर्टाने पडू नये - सॉलिसिटर जनरल साळवे - महाविकास आघाडी सरकार

शिंदे गटाला त्यांचा युक्तीवाद संपवण्यासाठी आज दुपारी पावणे बारावाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर सॉलिसिटर जनरल त्यांची भूमिका या प्रकरणात मांडणार आहेत. आज सुनावणी संपली तर निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Shiv Sena Political Crisis
ठाकरे-शिंदे गटाचा सत्ता संघर्षा
author img

By

Published : Mar 2, 2023, 9:20 AM IST

Updated : Mar 2, 2023, 2:38 PM IST

नवी दिल्ली - ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. आज शिंदे गटाचे वकील नीरज कौल तसेच राज्यपालांची बाजू सॉलिसिटर जनरल साळवे यांनी मांडली. तसेच इंटव्हिनर म्हणून जनतेच्या बाजूने सरोदे वकीलही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सुनावणीत सहभागी झाले होते. आजच युक्तीवाद पूर्ण करण्यासंदर्भात कोर्टाची भूमिका होती. मात्र आज पुन्हा युक्तीवाद अपूर्ण राहिला. त्यामुळे या खटल्याची पुढील सुनावणी मंगळवारी घेण्यात येणार आहे.

अपात्रतेची टांगती तलवार असली तरी... - अनेकदा विविध कारणाने विधानसभा सदस्यांंवर अपात्रतेची टांगती तलवार असते. त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात खटले सुरू असले तरी त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही. त्यांना सदस्य म्हणून कर्तव्ये पार पाडता येतात. त्यामुळे या खटल्यात सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार असताना ते मतदान करु शकत नाहीत, असे म्हणणे चुकीचे आहे आसा युक्तवाद साळवे यांनी केला.

एकच व्यक्ती दोन आघाड्यात उपमुख्यमंत्री होते - राजकारणात अनेक गोष्टी होत असतात. एखादी व्यक्ती एका आघाडीत आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते. तीच व्यक्ती काही दिवसातच दुसऱ्या आघआडीतही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते. हे झालेले आपण पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात त्यांचे नाव न घेता साळवी यांनी ही वस्तुस्थिती मांडली. साळवी यांनी ही गोष्ट सांगून राजकारणात कोर्टाने पडण्याची जाण्याची गरज नाही. मात्र राज्यपालांनी वस्तुस्थिती पाहता त्यांच्यापुढे एकच पर्याय उरतो, तो म्हणजे बहुमत चाचणी घेणे. जे काही आहे ते विधानसभेच्यापटलावर स्पष्ट होईल. तोच त्यांनी निर्णय घेतला असे साळवी यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टात सॉलिसिटर जनरल साळवी यांचा युक्तीवाद सुरू झाला आहे. साळवी यांनी सुरवातीलाच सांगितले की सिब्बल यांनी मांडलेला युक्तीवाद हा जर-तरवर आधारित होता. त्यामुळे त्याचा कितपत विचार करायचा हे कोर्टाला ठरवावे लागेल.

सुप्रीम कोर्टातील ठाकरे-शिंदे सत्ता संघर्षाची सुनावणी बुधवारी संपली. त्यामुळे आज गुरूवारी पुढची सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकीलही आज त्यांचे म्हणणे मांडणार आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची घटनापीठासमोरील सुनावणी पूर्ण होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. तशाप्रकारचे नियोजन तरी काल बुधवारी करण्यात आले होते. आज गुरूवारी ही सुनावणी संपली तर या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सरकार पडण्याची कल्पना : महाविकास आघाडी सरकार पडणार याची कल्पना त्यांना होती. त्यामुळेच त्यांनी घाईघाईने निर्णय घेतले. हे निर्णय त्यांना अगतिकतेमुळे घ्यावे लागले होते. न्यायाचाच मार्ग त्यांनी बंद करुन टाकला असा जोरदार युक्तीवाद शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला होता. दुसरीकडे सभापतींनी आमदार अपात्र ठरवले असते तर काय झाले असते, असा सवाल शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केला होता. त्यावर समजा 27 तारखेला अंतरिम आदेश पारित झाला नसता आणि सभापतींनी त्यांना अपात्र ठरवले असते, राज्यपालांनी विश्वासदर्शक ठराव पुकारणे योग्य ठरले असते का? असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

विश्वास नसल्याचे पत्र राज्यपालांना : शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी युक्तीवाद करताना सरकार अल्पमतात आले होते असे म्हटले. आमदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास नसल्याचे पत्र राज्यपालांना दिले होते. त्यामुळे राज्यपालांना निर्णय घेणे बंधनकारक होते. हीच बाब बोम्मई खटल्याचा संदर्भ देऊन पटवून देण्याचा प्रयत्न नीरज कौल यांनी केला. या दरम्यान, एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले गेले. त्यामध्ये कोर्टाने म्हटले होते की, राजकीय पक्षातील आमदारांनी सरकार स्थापनेत युतीला विरोध केला तर ते अपात्र ठरू शकतात. कोर्टाने अशा प्रकारचे निरीक्षण नोंदवल्याने शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे वकील कौल यांनी स्पष्ट केले होते की, विधिमंडळ पक्ष आणि पक्ष वेगळे करता येणार नाहीत.

महाविकास आघाडी सरकारला शिंदे गटाचा विरोध : शिंदे गटाचे वकील कौल यांनी युक्तीवाद सांगितले की महाविकास आघाडी सरकारला शिंदे गटाचा विरोध होता. यावेळी वकील कौल यांनी मध्य प्रदेशातील शिवराज चौहान खटल्याचा संदर्भ दिला होता. जेव्हा एखादा संविधानिक प्रश्न येतो तेव्हा विधानसभा अध्यक्ष तसेच राज्यपाल यांना घटनेने निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत असे शिंदे गटाचे वकील कौल म्हणाले होते.

सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात : सत्ता संघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू तर आहेच पण त्यावर आज निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेचा निर्णय देखील न्यायप्रविष्ठ आहे.शिवसेना कोणाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला. एकनाथ शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह बहाल केले गेले. राजकीय वर्तुळात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली होती. सत्ता संघर्षावरील सुनावणी याच आठवड्यात पूर्ण करण्याचा मानस सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी दोन दिवसात युक्तीवाद पूर्ण करण्याच्या सूचना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांना दिल्या आहेत. सॉलिसिटर जनरलसह सर्वांचा युक्तीवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाचा गुरुवारपर्यंत असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले होते.

हेही वाचा : Sanjay Raut on Shinde Group: अलीबाबा आणि चाळीस चोर हे टेस्ट ट्यूब बेबी; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Last Updated : Mar 2, 2023, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.