ETV Bharat / state

मतदारांना सुरक्षित छत्र आणि तरुणांना नशेतून मुक्त करण्यासाठी काम करणार - यामिनी जाधव - assembly elections bhayakhala

मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित छत्र आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना नशेतून मुक्त करण्याचे काम करणार असल्याचे शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी म्हटले आहे. मुंबईमधील भायखळा मतदार संघामधून यामिनी यांच्यासह एमआयएमचे आमदार वारीस पठाण, काँग्रेसचे उमेदवार मधू चव्हाण, अखिल भारतीय सेनेकडून अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी निवडणूक लढवत आहेत.

यामिनी जाधव
author img

By

Published : Oct 12, 2019, 12:38 PM IST

मुंबई - भायखळा मतदारसंघामध्ये अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. तसेच मतदारसंघातील तरुण नशेच्या आहारी गेला आहे. मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित छत्र आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना नशेतून मुक्त करण्याचे काम करणार असल्याचे शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी म्हटले आहे.

यामिनी जाधव

मुंबईमधील भायखळा मतदार संघामधून एमआयएमचे आमदार वारिस पठाण, काँग्रेसचे उमेदवार मधू चव्हाण, अखिल भारतीय सेनेकडून अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका यामिनी जाधव निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात म्हाडाच्या इमारतींची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यापैकी काही इमारती पडण्याच्या अवस्थेत आहेत. मी जर आमदार म्हणून निवडून आले तर या इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित छत्र देण्याला प्राधान्य देईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - मनीषा चौधरींच्या प्रचारासाठी स्मृती इराणी मैदानात

भायखळा मतदारसंघात राज्य सरकार किंवा महापालिकेचे एकही रिहॅब सेंटर नाही. खासगी रिहॅब सेंटर आहेत, मात्र तिथे होणारा खर्च जास्त असल्याने नागरिकांना परवडत नाही. तरुणांना यामधून बाहेर यायचे आहे. पालकांनाही त्यांच्या मुलांना बाहेर काढायचे आहे. मात्र, योग्य मार्ग सापडत नसल्याने ते आणखी नशेच्या आहारी जात आहेत.याच मुद्द्याला जाधव यांनी हात घातला आहे. तरूणांना यामधून बाहेर काढण्याचे सर्वात मोठे काम मला करायचे आहे ,असे यामिनी जाधव म्हणाल्या आहेत

Intro:मुंबई - भायखळा मतदार संघामध्ये अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. तसेच मतदारसंघातील तरुण नशेच्या आहारी गेला आहे. मतदारसंघातील नागरिकांना सुरक्षित छत्र आणि नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांना नशेच्या आहारातून मुक्त करण्याचे काम करणार असल्याचे शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी सांगितले. Body:मुंबईमधील भायखळा मतदार संघामधून एमआयएमचे आमदार वारीस पठाण, काँग्रेसचे उमेदवार मधू चव्हाण, अखिल भारतीय सेनेकडून डॉन अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नी माजी नगरसेविका यामिनी जाधव निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात म्हाडाच्या इमारतींची अवस्था अत्यंत बिकट आहे. त्यापैकी काही इमारती पडण्याच्या अवस्थेत आहेत. मी जर आमदार म्हणून निवडून आले तर या इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित छत्र देण्याला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे.

मतदार संघात बेरोजगारी आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळत नाही. मतदार संघात स्किल डेव्हलपमेंटचे काम गेल्या दोन वर्षात राबवले त्यात आणखी सुसूत्रता आणण्याचे काम करणार आहे. यामुळे प्रत्येकाला घरबसल्या काम मिळून त्यांची अडचण दूर होईल. माझा मतदार माझा माय बाप आहे तो कुठल्या धर्माचा किंवा जातीचा आहे याचा फरक पडत नाही असे यामिनी जाधव यांनी म्हटले आहे. या ठिकाणी कोण आमदार आहे, कोण आमदार होते, कोण उमेदवार निवडणूक लढवत आहेत याकडे लक्ष न देता मी काय करणार आहे याकडे मी जास्त लक्ष देत आहे. काम करण्याची मानसिकता असेल तर सर्वांसाठी काम करू शकतो असे जाधव म्हणाल्या.

तरुणांना नशेतून मुक्त करणार -
मुंबईमधील व माझ्या मतदार संघातील तरुण पिढी नशेच्या आहारी गेली आहे. या ठिकाणी राज्य सरकार किंवा महापालिकेचे एकही रिहॅब सेंटर नाही. खासगी एखादे रिहॅब सेंटर आहे. मात्र त्यामध्ये शुल्क जास्त असल्याने नागरिकांना परवडत नाही. राज्य सरकारने एखादे रिहॅब सेंटर काढावे. जे जे हॉस्पिटलमध्ये ते सेंटर सुरु करावे. तरुणांमध्ये बदल आणि सुधार घडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल. तरुणांना यामधून बाहेर यायचे आहे. पालकांनाही त्यांच्या मुलांना बाहेर काढायचे आहे. मात्र योग्य मार्ग सापडत नसल्याने ते आणखी नशेच्या आहारी जात आहेत. त्यांना यामधून बाहेर काढण्याचे सर्वात मोठे काम मला करायचे आहे असे यामिनी जाधव म्हणाल्या.

यामिनी जाधव यांचा बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.