ETV Bharat / state

Mumbai Nirbhaya Case : फास्ट ट्रॅकवर खटला चालवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - undefined

sakinaka-victim-death
sakinaka-victim-death
author img

By

Published : Sep 11, 2021, 12:11 PM IST

Updated : Sep 11, 2021, 3:17 PM IST

15:15 September 11

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य आहे. याप्रकरणी गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

14:26 September 11

साकिनाका बलात्कार प्रकरण : पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठविला

साकिनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठविला

12:46 September 11

नक्की काय आहे प्रकरण?

साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीचे सीसीटीव्ही

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खैरानी रोड येथे रात्री तीनच्या दरम्यान एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार पोलीस कंट्रोलला मिळाली होती. त्यानुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर जखमी महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी टाकण्यात आल्याने ती गंभीररीत्या जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे, असा अहवाल यावेळी डॉक्टरांनी पोलिसांना दिला.

एका आरोपीला अटक

या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 376, 323 आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी कोणी आरोपी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त महेश्वरी रेड्डी यांनी दिली.

12:09 September 11

साकीनाका येथील पीडित महिलेचा मृत्यू

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडीतेचा मृत्यू

मुंबई - साकीनाका येथी 32 वर्षीय महिलेवर अमानुष्य कृत्य करण्यात आले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे २४ तासांहून अधिक काळ सुरू असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.

मुंबईत साकीनाका येथील खैराणी रोडवर रात्रीच्या सुमारास एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात सळई टाकून जखमी करण्यात आले होते. या महिलेला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र या महिलेचा मृत्यू झाला आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने पीडित महिला वाचू शकली नाही. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकाला अटकही केली आहे.

Last Updated : Sep 11, 2021, 3:17 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

mumbai
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.