ETV Bharat / state

सदाभाऊ खोतांची विधानसभेसाठी भाजपकडे १२ जागांची मागणी

राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने १२ जागांची मागणी भाजपकडे केली आहे.

सदाभाऊ खोत
author img

By

Published : Jul 20, 2019, 10:39 AM IST

मुंबई - आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने १२ विधानसभा जागांची मागणी भाजपकडे केली आहे. अनेक ठिकाणी संघटना मजबूत असल्याने ही मागणी रास्त असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.

भाजपकडून मित्रपक्षांनी किती जागांची मागणी करायची, याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि अन्य मित्रपक्षांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये चर्चा करून जागा ठरवण्यात येणार आहेत. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे देण्यात येणार असून, त्यानंतर मित्रपक्षांच्या जागांचा निर्णय होणार असल्याचे खोत म्हणाले.

सदाभाऊ खोतांची विधानसेसाभाठी भाजपकडे १२ जागांची मागणी

विधानसभेच्या जागावाटपात न्याय मिळेल

लोकसभेत प्रामाणिक काम केल्याने चांगला निकाल लागला आहे. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपात निश्चित न्याय मिळेल. रयत क्रांतीने मागणी केलेल्या काही जागा भाजप आणि शिवसेनेच्या आहेत. या ठिकाणी ९० टक्के जागांवर भाजप-सेनेचे आमदार नाहीत. त्यामुळे जागवाटपात आम्ही उमेदरावारांसह यादी देऊ, सबळ उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असे सदाभाऊ खोत म्हणाले.

या १२ जागांची केली मागणी

इस्लामपूर, शाहूवाडी-पन्हाळा, कराड-उत्तर, माण, कोरेगाव, फलटण, नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ, नाशिकमशील सटाणा आणि विदर्भातील चिखली (बुलढाणा), मेहकर( बुलढाणा), मानखुर्द (मुंबई) अशा 12 मतदारसंघावर सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-सेना 135 जागा लढवणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर 18 जागा मित्रपक्षांना देण्याचे भाजपने याआधीच जाहीर केले आहे. भाजपबरोबर सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आठवले यांचा आरपीआय, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम हे मित्रपक्ष आहेत. 18 जागांमध्ये 12 जागांची मागणी सदाभाऊ खोत यांनी केल्याने भाजपपुढे मित्रपक्षांच्या जागावाटपाची डोकेदुखी यापुढच्या काळात नक्कीच वाढणार आहे.

Intro:Body:MH_MUM_01VIDHANSABHA_RAYATKRANTI_SADABHAU_KHOT_VIS_MH7204684

रयतक्रांतीचा भाजप- सेनेच्या विजयी जागांवर दावा नाही: सदाभाऊ खोत

१२ आमदार निवडणुक आणण्याची संघटनेची ताकद

मुंबई :  विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने 12 विधानसभा जागांची भाजपाकडे केली आहे. संघटनेची अनेक ठिकाणी पायामुळं घट्ट असल्याने ही मागणी रास्त असल्याची प्रतिक्रिया
रयत क्रांतीचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.

भाजपच्या मित्रपक्षांकडून किती जागांची मागणी करायची, याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि अन्य मित्रपक्षांची संयुक्त बैठक घेतली जाणार आहे.

त्यामध्ये चर्चा करून जागा ठरविण्यात येणार आहेत. याबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे देण्यात येणार असून, त्यानंतर मित्रपक्षांच्या जागांचा निर्णय होणार आहे,' असेही खोत म्हणाले. 

लोकसभेत प्रामाणिक काम केल्यानं चांगला निकाल लागला, त्यामुळं विधानसभेचेच्या जागावाटपात निश्चित न्याय मिळेल, असं खोत म्हणाले.

रयतक्रांतीनं मागणी केलेल्या काही जागा भाजपा आणि शिवसेनेचे आहेत, ९० टक्के जागांवर स्टँडींग आमदार नाहीत. त्यामुळं जागवाटपात आम्ही उमेदरावारांसह यादी देऊ, सबळ उमेदवार निश्चितपणे निवडून येतील असं सदाभाऊ खोत म्हणाले.

इस्लामपूर, शाहूवाडी पन्हाळा, कराड उत्तर, माण, कोरेगाव, फलटण, नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ नाशिकमशील सटाणा आणि विदर्भमधील चिखली ( बुलढाणा), मेहकर( बुलढाणा), मानखुर्द( मुंबई),
अशा 12 मतदारसंघावर सदाभाऊ खोत यांनी दावा केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजप - सेना 135 जागा लढवणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर 18 जागा मित्रपक्षांना देण्याचे भाजपाने याआधीच जाहीर केलं आहे. भाजपबरोबर सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना, आठवले यांचा आरपीआय, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम हे मित्र पक्ष आहेत. 

तेव्हा 18 जागांमध्ये 12 जागांची मागणी सदाभाऊ खोत यांनी केल्याने भाजपापुढे मित्रपक्षांच्या जागावाटपाची डोकेदुखी यापुढच्या काळांत नक्कीच वाढणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.