ETV Bharat / state

संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा... युजीसीकडून फेलोशिपमध्ये वाढ

विद्यापीठ अनुदान आयोगाने कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती आणि वरिष्ठ संशोधक पाठ्यवृत्ती या संशोधन पाठ्यवृत्तीची रक्‍कम जानेवारीमध्ये वाढवली होती. त्यानंतर आता मानव्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रांसाठीच्या पाठ्यवृत्तीची रक्‍कम वाढवण्याचा निर्णय यूजीसीच्या 546 व्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

research-student-fellowship-increase-by-ugc
युजीसीकडून फेलोशिपमध्ये वाढ
author img

By

Published : Jun 21, 2020, 2:17 AM IST

मुंबई- कोरोनामुळे देशभरातील आर्थिक व्यवहार मंदावले आहेत. त्यातच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील संशोधक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात मानव्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी देण्यात येणाऱ्या फेलोशिपमध्ये वाढ केली जाणार असल्याने संशोधक विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती (जेआरएफ) आणि वरिष्ठ संशोधक पाठ्यवृत्ती (एसआरएफ) या संशोधन पाठ्यवृत्तीची रक्‍कम जानेवारीमध्ये वाढवली होती. त्यानंतर आता मानव्यविज्ञान आणि सामाजिक शास्त्रांसाठीच्या पाठ्यवृत्तीची रक्‍कम वाढवण्याचा निर्णय यूजीसीच्या 546 व्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्यानुसार डॉ. डी.एस. कोठारी पाठ्यवृत्तीमध्ये सर्वसाधारणसाठी पहिल्या वर्षात तीन हजार, द्वितीय वर्षात चार हजार, तृतीय वर्षात साडेसात हजार, उच्च गटात साडेसात हजार रुपये वाढवण्यात आले आहेत.

डॉ. एस.आर. बालकृष्णन पाठ्यवृत्तीमध्ये पहिल्या वर्षासाठी आठ हजार दोनशे, द्वितीय वर्षासाठी आठ हजार सातशे, तृतीय वर्षासाठी बारा हजार शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठीच्या पीडीएफ पाठ्यवृत्तीमध्ये अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी अनुक्रमे आठ हजार दोनशे, नऊ हजार दोनशे आणि तृतीय वर्षासाठी सात हजार पाचशे रुपये वाढवले आहेत. महिलांसाठीच्या पीडीएफ पाठ्यवृत्तीसाठी आठ हजार दोनशे, दहा हजार दोनशे, सात हजार पाचशे रुपयांनी वाढ केल्याचे यूजीसीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

मुंबई विद्यापीठ, एस एन डी टी महिला विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सोबत राज्यातील इतर विद्यापीठातील असंख्य प्राध्यापक मानव्यविज्ञान, सामाजिक शास्त्रे या विषयांसाठी विद्यार्थी अनुदान आयोगाकडे फेलोशिपसाठी प्रयत्न करत असतात. त्यासाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ केली जावी अशी आम्ही मागणी करत होतो, आता ती आयोगाने मान्य केली असल्याने त्याचा असंख्य प्राध्यापकांना लाभ होईल, असा विश्वास एमफुक्टो प्राध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब साळवे यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.