मुंबई : महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच रेमडेसिवीरचा काळाबाजारही सुरू आहे. रेमडेसिवीरचा असाच काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अंधेरीत गुन्हे शाखेने याबाबतची कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराचा सुळसुळाट
रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रूग्णाना दिले जाते. त्यासाठी काही नियम व अटीही शासनाने घालून दिल्या आहेत. मात्र, काही मेडिकल्समधून या इंजेक्शनची मूळ रक्कमेपेक्षा जास्त भावाने विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यातच, या इंजेक्शनचा काळाबाजारही केला जात आहे. मुंबईतील अंधेरीत गुन्हे शाखेने रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराचा पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच, 272 रेमेडेसीवीर इंजेक्शन जप्त केले आहेत. जीआर फार्मा नावाच्या शॉपमधून हे इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा - अमरावतीत कोरोना लसीचा तुटवडा, जिल्ह्यात 25 पेक्षा जास्त लसीकरण केंद्र बंद
हेही वाचा - "पहचान कौन? म्हणत शायरीद्वारे अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा