मुंबई : ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मांतर केले जात असल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली. या गेमिंगच्या माध्यमातून साधरण 400 जणांचे धर्मांतर केले गेले असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान या 400 मधील एक जानी अडनावाचे कुटुंब. या कुटुंबाचा देखील धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. वसईमधील जानी कुटुंबातील प्रमुख पुरुष राजेश जानी याचे धर्मांतर करण्यात आले आहे.
असा समोर आला प्रकार : राजेश जानी सध्या मुंब्र्यात राहत आहे. राजेश जानी यांच्या धर्मांतरानंतर त्यांच्या मुलावरही धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर मुलाने थेट पोलीस स्टेशन गाठलं त्यामुळे हे प्रकरण समोर आले. राजेश जानी हा मुस्लीम बनवल्यानंतर त्याच्या 18 वर्षांच्या मुलालाही मुस्लिम बनविण्याचा प्रयत्न झाला. देवांग जानी हा तरूण वसईच्या मिस्त्री नगर येथे राहतो. त्याचे वडील राजेश जानी हे मुस्लीम धर्माच्या प्रभावाखाली येऊन त्यांचे धर्मपरिवर्तन केले. वडिलांचे धर्मपरिवर्तन केल्यानंतर काही दिवसांनी देवांगलाही मुस्लिम बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवांगला सतत करून त्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र आरोपीचा हा प्रयत्न फसला. त्याने देवांगने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी मुंब्रा येथून मोहसीनला अटक केली.
आरोपी भोंदूबाबाला अटक : वसईतील राजेश जानी या इसमाला मुस्लिम बनविल्यानंतर त्याच्या मुलालाही फोनवरून मुस्लिम बनविण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, मुलाने हा प्रकार माणिकपूर पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपी मोहसीन सोनी याला मुंब्रा येथून अटक केली. तसेच त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. देवांग जानी हा तरूण वसईच्या मिस्त्री नगर येथे राहतो. त्याचे वडील राजेश जानी हे मुस्लीम धर्माच्या प्रभावाखाली आले आहेत.
18 जूनपर्यंत पोलीस कोठडी : काही दिवसांपूर्वी देवांग याला मुंब्रा येथील मोहसीन सोनी हा इसम फोन करून इस्लाम धर्माबाबात सांगत होता. तुझे वडील आमच्याकडे आहेत. तु सुध्दा ये असे सांगण्यात येत होते. दरम्यान मोहसीन याने दैवी शक्ती असल्याचा दावा केला. मात्र देवांग त्यांच्या जाळ्यात सापडला नाही. त्याने थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मोहसीनविरोधात अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मंगळवारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
धर्म बदलल्याची कबुली : राजेश जानी हा जोगेश्वरी येथील एका कंपनीच्या कारखान्यात सेल्समन म्हणून काम करतो. जानी हा 25 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता कामानिमित्त घराबाहेर पडला होता. मात्र तो घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने दुसऱ्या दिवशी माणिकपूर पोलीस ठाणे गाठून पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान राजेश जानी यांच्या पत्नीने त्याला मोबाईलवर संपर्क साधला. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि त्याने सांगितले की, तुमच्या पतीने इस्लाम धर्म कबूल केला आहे. तुम्ही देखील इस्लाम धर्म स्वीकारा, असे सांगितल्याचा दावा राज्याच्या पत्नीने केला. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी राजेश उर्फ मोहम्मद रियाज (50) याच्याशी संपर्क साधला. गुरुवारी रात्रीही त्यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली. त्यावेळी त्याने स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारल्याची कबुली दिली.
राजेश जॉनी धर्मांतर केल्याची तोंडी तक्रार त्यांच्या पत्नीने केली आहे .तो हरवल्याची लेखी तक्रार करण्यात आली आहे. आम्ही राजेशला प्रत्यक्ष भेट पोलीस ठाण्यात बोलावले तेव्हा तो आला होता. त्याने मी स्वच्छतेने धर्मांतर केल्याची माहिती आम्हाला दिली आहे. - पौर्णिमा चौघुले, पोलीस उपायुक्त.
हेही वाचा -