ETV Bharat / state

ड्रग्ज ते दंगल! वाचा राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका, एका क्लिकवर... - हसन मुश्रीफ

राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका ड्रग्ज माफियाशी असलेला संबंधापासून, दंगलीशी असलेल्या संबंधापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते आहे.

allegations
allegations
author img

By

Published : Nov 16, 2021, 9:34 PM IST

Updated : Nov 17, 2021, 6:58 AM IST

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची सरबत्ती लावली होती. मात्र, आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका (allegations between bjp and mahavikas aghadi ) ड्रग्ज माफियाशी असलेला संबंधापासून, दंगलीशी असलेल्या संबंधापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते आहे.

एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप -

28 नोव्हेंबर 2019 या दिवशी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. या दिवशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav thackrey) यांनी शपथ घेतली. आघाडी सरकार आता जवळपास दोन वर्ष पूर्ण करत असताना हा पूर्ण कार्यकाळ पाहिला असता राज्यामधील विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष (BJP) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (mahavikas aghadi) असलेले शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीन पक्षांमध्ये वेळोवेळी एकमेकांवर गंभीर आरोप केलेले पहिला मिळतात. अगदी या दोन वर्षांमध्ये दोन्ही बाजूने भ्रष्टाचारावरून सुरू झालेल्या आरोपांची मालिका आता ड्रग्ज (Drug) आणि माफिया संबंधांपर्यंत येऊन पोहोचली आहे. तर राज्यात सत्ताधारी दंगलखोरांना पाठिंबा देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे सत्ता नसल्याने अस्वस्थ झालेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यांमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येतो. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपा पासून सुरू झालेली ही मालिका आता दंगल घडवण्याच्या आरोपापर्यंत येऊन पोहोचली आहे असंच म्हणावं लागेल.

अनेक नेत्यांवर तपास यंत्रणेचा ससेमिरा -

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आघाडी सरकारमधील नेते तसेच मंत्री यांच्यावर विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने एकापाठोपाठ एक भ्रष्टाचार असलेल्या आरोप केले होते. खास करून भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांवर आरोपांची झोड उठवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab), खासदार भावना गवळी (Bhavna Gawali), मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) , मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यापैकी अनिल देशमुख प्रताप सरनाईक भावना गवळी यासारख्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरादेखील सुरू झाला आहे. त्यात आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या झालेल्या कार्यकारिणी बैठकीत आमदार आशिष शेलार (Ashish Shelar)यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर असलेल्या आरोपांची मालिका वाचून दाखवली.

महाविकास आघाडी सरकारचा पलटवार -

भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने होणारे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोपांंची मालिका थांबत नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनीदेखील भाजपाच्या आरोपांना तेवढ्याच प्रखरतेने उत्तर द्यायला हवा. असा सल्ला पत्रकार परिषदेतून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाला तेवढ्याच प्रखरतेने उत्तर देण्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सुरू केली. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या आरोपांच्या मालिकेनंतर त्यांना उत्तर देणं गरजेचे होते. सूडबुद्धीने आरोप करणे चुकीचे असून शेराला सव्वाशेर मिळतोच. केवळ सरकारला पाडण्यासाठी किंवा सरकार अस्थीर करण्यासाठी भाजपकडून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

'भाजप नेत्यांचा ड्रग्स माफियांशी संबंध' -

2 ऑक्टोबर रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) मुंबईत कार्डिलीया (Cordelia Cruise) क्रूजवर धाड टाकत अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्यासह त्याच्या दोन मित्रांना अटक केले. मात्र या कारवाईत एनसीबीने पूर्णपणे बनाव केला असून, या संपूर्ण बनावाच्या मागे भारतीय जनता पक्षाचे नेते असल्याचा खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला. तसेच राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र ड्रग्ज माफियांना आंदण दिले. स्वतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग माफियाशी संबंध असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला होता.

मलिकांनी दहशतवाद्यांची जमीन विकत घेतल्याचा आरोप -

राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी 1996 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी असलेले दोन आरोपी सरदार खान आणि सलीम पटेल यांच्याकडून कुर्ल्यामध्ये जवळपास तीन एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच दहशतवाद्यांकडून नवाब मलिक त्यांना जमीन खरेदी करण्याचं कारण काय? असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता.

फडणवीसांचे ड्रग्ज माफिया अंडरवर्ल्डशी संबंध -

देवेंद्र फडणीस यांनी नवाब मलिक त्यांच्यावर केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांचेही दहशतवादाशी संबंधीत असलेल्या गुंडांशी संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला. मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गुंडांना पाठीशी घातले, असा खळबळजनक आरोपही नवाब मलिक त्यांच्याकडून करण्यात आला होता. तर तिथेच देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या आणि अभिनय केलेल्या गाण्याच्या अल्बमला ड्रग्ज माफिया असलेल्या जयदीप राणा याने अर्थसहाय्य केले असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

अमरावती दंगलीवरून आरोप-प्रत्यारोप -

भ्रष्टाचार आणि ड्रग्ज माफिया यांच्याशी असलेल्या संबंधावर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेवरून राज्यामध्ये नांदेड, अमरावती आणि मालेगाव यातील ठिकाण मोर्चे काढण्यात आले. मात्र, या तिन्ही जागी मोर्चाला गालबोट लागले. खास करून अमरावतीमध्ये दंगल (Amravati Violence) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र, ही परिस्थिती निर्माण करण्यामागे सत्ताधारी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला. तर राज्यातील सत्ता काही करून आपल्या हाती लागत नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्ष राज्यांमध्ये दंगल घडवण्याचा प्रकार करत असल्याचा खळबळजनक आरोप सत्ताधारी पक्षाकडून लावल्या जातो आहे.

Last Updated : Nov 17, 2021, 6:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.