ETV Bharat / state

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर काय म्हणाले नेतेमंडळी, वाचा संपूर्ण बातमी...

author img

By

Published : Feb 3, 2021, 8:29 PM IST

अर्थसंकल्पाचे सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वागत केले आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसचे विरोधीपक्षनेते रवीराजा व समजावादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी या अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Mumbai mnc Budget News
मुंबई महापालिका अर्थसंकल्प बातमी

मुंबई - आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वागत केले. तर, दुसरीकडे काँग्रेसचे विरोधीपक्षनेते रवीराजा व समजावादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी या अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना पालिकेचे विरोधी पक्ष नेते रवी राजा, समाजवादी पक्षाचे गटनेता रईस शेख आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव

हेही वाचा - विखारी वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीला तातडीने अटक करा - चंद्रकांत पाटील

या अर्थसंकल्पाबाबत कोण काय म्हणाले...

बजेटमध्ये नवीन असे काही नाही. 33 हजार कोटीवरून ते जवळपास 40 हजार कोटी केले. पालिकेला पैसे कुठून येणार. पालिकेच्या शाळांची नावे बदलन्याचा निर्णय घेण्यात आला आहे, हे अगदी स्वागतार्ह आहे. पालिकेच्या शाळा आता नंबरनुसार नाही, तर आता नावाने ओळखल्या जातील. गरीब मुलांना देखील वाटेल, की आपण चांगल्या शाळेत शिकत आहोत. कोस्टल प्रोजेक्ट हा सत्तेत बसलेल्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याला सर्वात जास्त पैसे दिले आहेत. या बजेटमध्ये नवीन असे काही नाही. जे जुने प्रोजेक्ट आहेत, त्यांनाच पुन्हा पैसे दिले आहेत, असे विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

अपेक्षाभंग झालेला अर्थसंकल्प

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या सन २०२१-२२ चा ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र, या अर्थसंकल्पात आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि गोरगरिबांसाठी काहीच घोषणा केलेली नाही. अर्थात हा अर्थसंकल्प अत्यंत निंदनीय आणि श्रीमंतांचे खिसे भरणारा आहे. इतकेच नव्हे तर, हेल्थ कार्ड आणि आरोग्य यंत्रणेवर कोरोना काळात काही मोठे पॅकेज घोषित होईल, अशी अपेक्षा होती. पण, अर्थसंकल्प सादर झाल्यावर पूर्णत: आमच्या अपेक्षाभंग झाल्या, अशी टीका समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली.

अर्थसंकल्पाचे स्वागत

या अर्थसंकल्पात अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पात आरोग्यावर काही भर देण्यात आला आहे. कर वाढ, शुल्क वाढ प्रशासन दरवर्षी करत असते. प्रकल्प बाधितांसाठी घेण्यात आलेला निर्णय हा दिलासा देणारा आहे. त्यांचे पुनर्वसन योग्य रितीने झाले नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी सांगितले.

आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देणारा हा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे, कोरोनामुळे महापालिका आर्थिक तोट्यात असूनसुद्धा मुंबईकरांची कोणत्याही प्रकारची कर वाढ केली गेली नाही, अशी प्रतिक्रिया स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

तसेच, विरोधी पक्षाकडून केलेल्या टीकेवर उत्तर देत यशवंत जाधव म्हणाले की, आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, अशी वृत्ती भाजप पक्षाची राहिली आहे. त्यामुळे, या अर्थसंकल्पाला विरोध करायचे म्हणून काही मुद्दे उपस्थित करत आहेत.

हेही वाचा - लवकरच महिलांसाठी अत्याधुनिक फिरता दवाखाना - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.