ETV Bharat / state

केंद्रीय अर्थसंकल्प 2020: 'अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली' - अर्थसंकल्पावर राजू शेट्टींची टीका

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनीही हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी बुडबुडा असल्याचे म्हटले आहे.

Raju shetti comment on Budget 2020
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
author img

By

Published : Feb 1, 2020, 6:09 PM IST

Updated : Feb 1, 2020, 7:15 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नवीन असे काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगाच्या संदर्भात कोणतीच ठोस तरतूद केली नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी बुडबुडा असून, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केल्याचे शेट्टी म्हणाले.

'अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली'

फक्त योजना आखून शेती सुधारत नाही. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद केल्याचा गाजावाजा केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी हा फक्त बुडबुडा असल्याचे शेट्टींनी म्हटले आहे. शेतकरी कर्जबाजारी होत आहे. आत्महत्या वाढत आहेत, पायाभुत सुविधांचा अभाव आहे, नवीन तंत्रज्ञान मिळत नाही, नवीन संशोधनाकडे सरकारचं दुर्लक्ष झाले आहे. या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. एकाबाजूला शेतीसाठी भरीव तरतूद केल्याचा त्यांनी फक्त गाजावाजा केल्याचे शेट्टी म्हणाले. प्रत्यक्षात कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटींची तर 1 लाख 23 हजार कोटी हे जलसंधारण ग्रामीण विकासासाठी केली. मात्र, देशाचे आकारमान बघता आणि शेती क्षेत्राची झालेली फरपट बघता. ही तरतूद खूप तुटपुंजी असल्याचे म्हणत शेट्टींनी अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली.

Intro:Body: mh_mum_budget_raju_shetty__mumbai_7204684
केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे शेतकऱ्यांसाठी बुडबुडा: राजू शेट्टी यांची टीका
मुंबई :केंद्रीय अर्थमंत्री निर्मता सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये त्यांनी कृषी, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, ग्रामीण भाग आदी क्षेत्रांना चालना देण्याच्या दृष्टीने भरीव तरतूद केली आहे. अडीच तासांपेक्षा अधिक कालावधी हा अर्थसंकल्पाचे वाचन करण्यासाठी लागला. या अर्थसंकल्पामध्ये आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या बजेटवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बजेटमध्ये नव असं काहीच नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच साखर उद्योगास संदर्भात देखील कोणतीच ठोस तरतूदीचा निर्णय घेण्यात आलेला नाही. वेगवेगळ्या बाबींवर घेतलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव दिलं असं सांगितलं जातंय. मात्र शेतकऱ्यांसाठी हा फक्त बुडबुडा आहे. फक्त योजना आखून शेती सुधारत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्या वाढत आहे, पायाभुत सुविधांचा अभाव आहे, नवीन तंत्रज्ञान मिळत नाही, नवीन संशोधनाकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. एकाबाजूला शेतीसाठी भरीव तरतूद केल्याचा त्यांनी फक्त गाजावाजा केला आहे. प्रत्यक्षात कृषीक्षेत्रासाठी 1 लाख 60 हजार कोटीची तर 1 लाख 23 हजार कोटी हे जलसंधारण ग्रामीण विकासासाठी केली. मात्र देशाचे आकारमान बघता आणि शेती क्षेत्राची झालेली फरपट बघता. ही तरतूद खूप तुटपुंजी आहे अशा शब्दात राजू शेट्टींनी टीका केली आहे.

Conclusion:
Last Updated : Feb 1, 2020, 7:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.