ETV Bharat / state

'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल' - राज ठाकरे दिंडोशी

सर्वजण आपली प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येतात. आतापर्यंत जी विरोधी भूमिका रस्त्यावर दाखवत होतो ते आता विधानसभेत दाखवायची आहे, असे वक्तव्य राज ठाकरेंनी दिंडोशी येथील सभेत केले.

राज ठाकरे दिंडोशी येथील सभेत
author img

By

Published : Oct 13, 2019, 9:44 PM IST

Updated : Oct 13, 2019, 11:24 PM IST

मुंबई- मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते मुंबईतील दिंडोशी येथील सभेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, की भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काँग्रेस मधील नेते भाजपात गेले. त्यामुळे सरकारविरोधातील आवाज उठवण्यासाठी माणसंच नाहीत. म्हणून लोकांच्या व्यथा ऐकून त्यांच्यासाठी आरेला कारे करण्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतला.

राज ठाकरे दिंडोशी येथील सभेत

सर्वजण आपले प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येता. आतापर्यंत जी विरोधी भूमिका रस्त्यावर दाखवत होतो, ती आता विधानसभेत दाखवायची आहे, असेही ते म्हणाले. आपले लोक पुलवामा हल्ला, ३७० कलम हटवले यासारख्या मुद्द्यांवर भावनिक होऊन मतदान करतात. अमित शाह महाराष्ट्रात येऊन कलम ३७० हटवल्याचा प्रचार करतात, मात्र, काश्मीरमधील कलमाचा महाराष्ट्रातील जनतेशी काय संबंध? असाही सवाल, यावेळी बोलताना राज यांनी केला.

गेल्या पाच वर्षात शिवसेना-भाजपने योग्य सरकार चालवले नाही. महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा व मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला विरोध करणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी विदर्भ प्रकरणी सुधीर मुनगंटीवार व बुलेट ट्रेन प्रश्नी मोदी सरकारला दिला. शिवसेनेच्या जाहीरनाम्यात दहा रुपयांत थाळीवर देखील राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आरेत रात्रीच्या वेळी झाड तोडली गेली आणि त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आरेला सत्ता आल्यावर जंगल घोषित करायचंय असे म्हणत, राज ठाकरेंनी शिवसेनेवर घणाघात केला.जगात मंदी असून उद्योगधंदे बंद पडलेत, बँका बुडीत निघाल्या असताना अर्थमंत्री हात वर करून बसलेत. रिक्षा-टॅक्सी अधिकृत की अनअधिकृत आहे हे कळत नाही. टॅक्सी रिक्षा वाले आता पोलिसांवर हल्ले करू लागलेत. हे सर्व होत असताना तुम्ही फक्त आता शांत बसून रहा. तुमचा राग फक्त व्हाट्सअप वर दिसतो आहे, असा संताप देखील राज ठाकरे यांनी जनतेच्या शांत राहण्यावर केला.
घाटकोपरचा आमदार राम होता, भाजपमध्ये गेल्यावर रावण झाला, असा टोला देखील राज ठाकरेंनी त्यांचे जुने सहकारी व घाटकोपरचे भाजपचे उमेदवार राम कदम यांना लगावला.

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी शिवसेनेच्या 'हीच ती वेळ' या टॅगलाईनवरही निशाणा साधला. म्हणाले, गेल्या पाच वर्षात वेळ नव्हता का? पैशाचे काम अडलं की, सरकारनी केलं नाही तर राजीनामे देऊ, अशा धमक्या देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. असा आरोपही राज ठाकरेंनी शिवसेनेवर प्रचारसभेत केला.

सुरक्षा प्रश्न, बँकांमधल्या ठेवी अशा सगळ्याच प्रश्नांच्या न्यायासाठी जनता सरकारकडे न जाता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येते. सतत रस्त्यावर उतरून विरोधी पक्षाची भूमिका मनसेने घेतलीय, तीच भूमिका घेऊन विधानसभेत जायचंय, त्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. देशात आलेली मंदी, वाढती बेरोजगारी, बंद पडलेले उद्योगधंदे आणि बुडीत निघालेल्या बँकाप्रकरणी राज ठाकरेंनी भाजपसरकारवर ताशेरे ओढले. मुंबई, ठाणे व पुण्यातील खड्डयांबाबत टीका करत, कंत्राटदाराला एक टक्काही न देता नाशिक खड्डेमुक्त केल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. मनसेने घेतलेली सर्व आंदोलन शेवटपर्यंत नेत ती यशस्वी केली, त्यावेळी सत्ताधारी कुठे होते असा सवाल उपस्थित त्यांनी उपस्थित केला. येत्या २१ तारखेला मतदान होणार त्यावेळी तुम्ही तुमची जबाबदारी निभवा. सत्ताधारी त्यांचा अधिकार गमावून बसले आहेत, मीच सांगतो 'हीच ती वेळ' असे म्हणत राज ठाकरेंनी जनतेला मनसेला मतदान करण्याचे आव्हान केले.

Intro:भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काँग्रेस मध्ये गेले
विरोधातील आवाज उठवण्यासाठी माणस नाहीत म्हणून लोकांच्या व्यथा आवाज, आरे ला कारे करण्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतला.
सर्व आपली प्रश्न घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येतात. जी आजपर्यंत विरोधी भूमिका रस्त्यावर दाखवत होतो ते आता विधानसभेत दाखवायची आहे.
पुन्हा तिचं माणस सत्तेवर बसणार आहे. आमची लोक पुलवामा, 370 कलम या भावनेने मतदान करतात. देशामध्ये कोणत्या गोष्टी घडवल्या जाणार आहेत. अमित शहा महाराष्ट्रात 370 कलम काढल्याचा प्रचार करतात. मात्र महाराष्ट्रपासून मुंबई वेगळं करण्याचा प्रयत्न केल्यास भारी पडेल राज ठाकरे यांनी दिला इशाराBody:बाबConclusion:
Last Updated : Oct 13, 2019, 11:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.