ETV Bharat / state

रेमडेसिवीरसह अत्यावश्यक साहित्याचे खरेदी-वितरण राज्यांकडे द्या; राज ठाकरेंचे मोदींना पत्र - Raj thackeray narendra modi letter news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात राज्यातील कोरोना परिस्थिती आणि रेमडेसिवीर - ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत लिहिले आहे. रेमडेसिवीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी ठाकरेंनी मोदींकडे केली आहे.

Mumbai
Mumbai
author img

By

Published : Apr 22, 2021, 4:21 PM IST

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना साद घातली आहे. रेमडेसिवीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.

राज ठाकरेंनी काय म्हटलंय पत्रात?

'संपूर्ण देशात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांचे आकडे वाढत आहेत. सध्या देशात रुग्णसंख्येने एका दिवसात ३ लाखाचा आकडा गाठला आहे. मृत्यूचे आकडेही चिंताजनक आहेत. मृतांच्या रांगाच्या रांगा असलेली गुजरातमधली आणि बाकी राज्यातलीही दृश्यं पाहिली. ती मनातून जात नाहीत. ही वेळ खरंच भीषण आहे, राजकारणाची मुळीच नाही. आता देशातल्या सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीचा मुकाबला करण्याची आवश्यकता आहे', असे राज यांनी पत्रात म्हटले आहे.

व्यवस्थापन फार काळजीपूर्वक उभं करण्याची गरज -

'आरोग्यसेवेची यंत्रणा संपूर्णपणे कोसळली आहे. कोरोनाबाबतच्या चाचण्या पुरेशा गतीनं होत नाहीत. रुग्णालयात पुरेशा खाटा नाहीत, उपचारासाठी आवश्यक रेमडेसिवीर आणि इतर साधने उपलब्ध नाहीत. अत्यंत गरजेचा असा ऑक्सिजनचा पुरवठाही सुरळीत नाही. लसीकरण आपण खुलं केलं आहे. परंतु त्यासाठी योग्य संख्येनं पुरवठा होईल की नाही? याची खात्री नाही. आपण या साथरोगाबाबतीतलं व्यवस्थापन फार काळजीपूर्वक उभं करण्याची गरज आहे', असे राज ठाकरे म्हणाले.

गेल्या १०० वर्षातील मोठं संकट -

'भारताच्या इतिहासात इतकं मोठं आरोग्य संकट गेल्या १०० वर्षात आलं नसावं. हे आव्हान म्हणूनच फार मोठं आहे. अशातच बातमी वाचली की रेमडेसिवीर सारख्या कोरोनावरील उपचारासाठी अत्यंत आवश्यक अशा इंजेक्शनची खरेदी आणि वितरण केंद्र सरकार स्वत: करणार आहे. मला हे वाचून धक्काच बसला. आपण नुकतं देशाला उद्देशून केलेलं भाषण मी काळजीपूर्वक ऐकलं. त्यात आपण राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत आणि या भयानक संकटाचा सामना करण्यासाठी त्यांनी काय काय पावलं उचलली पाहिजेत? याचं मार्गदर्शनही केलं आहे', असे ठाकरे म्हणाले.

केंद्रानं रेमडेसिवीरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय?'

'मग रेमडेसिवीर सारख्या औषधांची खरेदी आणि वितरण केंद्रानं स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय? वास्तविक असं दिसतंय की त्या त्या राज्यांमध्ये राज्य सरकारचा आरोग्य विभाग, तेथील महानगरपालिका, स्थानिक यंत्रणा, विविध पातळ्यांवरील कर्मचारी असेच लोक अग्रभागी आहेत. तेच लोकांचे प्राण वाचवणं आणि त्यांना योग्य उपचार देणं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. असं असताना केंद्रानं रेमडेसिवीरचं व्यवस्थापन स्वत:कडे ठेवण्याचं प्रयोजन काय?', असे प्रश्न राज ठाकरेंनी मोदींना केले आहेत.

केंद्रानं रेमडेसिवीरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवू नये -

'कोरोना विरुध्दच्या लढाईत केंद्राची भूमिका ही सहायकाची, समन्वयाची आणि मार्गदर्शनाची आहे. यात प्रत्यक्षात अग्रणी आहे राज्य सरकारांची यंत्रणा. अशा परिस्थितीत केंद्रानं रेमडेसिवीरच्या वितरणाची यंत्रणा स्वत:कडे ठेवू नये. यातून प्रत्यक्ष काम करतात अशा यंत्रणांवरचा अविश्वास तर दिसतोच; शिवाय त्यांच्याकडे असलेल्या स्थानिक परिस्थितीच्या आकलनाला आपण कमी लेखतो आहे, असं दिसतं', असं ठाकरे म्हणाले.

'माझी आपल्याला नम्र विनंती आहे, की 'रेमडेसिवीर कसं घ्यायचं? कुठे, कसं वितरित करायचं? याची संपूर्ण जबाबदारी आपण राज्यांकडे सोपवावी. ते काम खरंतर केंद्राचं नाही'', असेही ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना विरूध्दची ही लढाई मोठी आहे. तिथे आपल्या सर्वांना एकत्र येऊन समन्वयानं, सहकार्यानं काम करण्याची गरज आहे. राज्य सरकारांच्या स्थानिक परिस्थितीबाबतच्या आकलनाचा आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणांचा इथे आपल्याला अधिक चांगल्या पध्दतीनं उपयोग करून घ्यायला हवा. आपल्या संविधानानं दिलेल्या संघराज्य पध्दतीचा आत्माही तोच आहे. मला आशा आहे की आपण माझ्या या विनंतीचा सकारात्मक विचार कराल अणि राज्य सरकारांना ह्या बाबतीतील प्रशासकीय स्वातंत्र्य द्याल, असे शेवटी राज ठाकरेंनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.