ETV Bharat / state

Raj Thackeray On Unemployment Issue : प्रश्न फक्त मराठा तरुण-तरुणींचा नाही एकूणच मराठी जनतेचा आहे - राज ठाकरे

Raj Thackeray On Unemployment Issue : जालन्यात काल झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या (Jalna baton charge) मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य करत सरकारला धारेवर धरलं आहे. मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाही, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे, असं ते म्हणाले. (Maratha Reservation)

Raj Thackeray On Unemployment Issue
राज ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 5:25 PM IST

मुंबई Raj Thackeray On Unemployment Issue : मराठा आरक्षणाचं प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यावर राज ठाकरे म्हणतात की, मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा (Jalna baton charge) समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल, ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? इथं घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाही. तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं. मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे, असं राज ठाकरे म्हणाले. (Maratha Reservation)

मराठा समाजाकडून राज्यभरात बैठका : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला शुक्रवारी उग्र रूप आलं. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठचार्ज केल्यामुळे उपोषणकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर आता आज बीड, लातूर, धाराशिव आणि परभणीत बंद पुकारण्यात आला आहे. मुंबई आणि नाशिकमध्ये मराठा संघटनांनी तातडीच्या बैठका बोलावल्या आहेत. याचा महामार्गावरील वाहने आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मराठा आंदोलन आदर्श पद्धतीने : या प्रकरणावर राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला, असं दबक्या आवाजात बोललं जात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती, असंही राज ठाकरे म्हणाले.

अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल टाकलं नसेल. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित. राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. - राज ठाकरे, मनसे प्रमुख

त्यात प्रशासनाची चूकच : साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकली सवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आताच्यांनी करू नयेत. काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे. पण, ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे.

राज ठाकरेंची भावनिक साद : चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे. माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की, ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहे, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो. पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही, ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील, असं म्हणत एक भावनिक साद देखील राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना घातली आहे.

हेही वाचा:

  1. Lathicharge in Jalna : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; संजय राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
  2. Lathicharge on Maratha Protester : आधी मोठे मोर्चे निघाले, पण आताच....? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
  3. Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठीचार्ज; राज्यभरात मराठा समाज आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.