ETV Bharat / state

ठाकरेंच्या 'राज'सभांच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होणार का?

author img

By

Published : Oct 16, 2019, 1:13 PM IST

मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभांना नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यांच्या सभांना माणसं गोळा करण्याची वेळ पडत नाही. जेथे सभा असेल तेथे हाऊसफुल्ल गर्दी दिसून येते. पण, या गर्दीचे मतात रूपांतर किती होणार हा प्रश्न आहे.

राज ठाकरे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस उरले आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. गेल्या अनेक निवडणुकांपासून सातत्याने पिछाडीवर जात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभांना नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यांच्या सभांना माणसं गोळा करण्याची वेळ पडत नाही. जेथे सभा असेल तेथे हाऊसफुल्ल गर्दी दिसून येते. पण, या गर्दीचे मतात रूपांतर किती होणार हा प्रश्न आहे.

हेही वाचा - नारायण राणे अखेर भाजपवासी; स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन

या निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी टीका केली. एकादा नेता सभागृहात सक्षम विरोधी पक्षनेता होण्यासाठी मतदान मागत असल्याची ही पहिलीच वेळ असावी. यावर काहीजण त्यांच्या पक्षात उभारी घेण्याची ताकद नसल्याचे म्हणत आहेत. मात्र, राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक सभेमधून महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज का आहे. बहुमतातील सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष किती गरजेचा असल्याचे ते विविध कारणे देत पटवून सांगत आहेत.

हेही वाचा - लग्नासाठी गड-किल्ले भाड्याने देणे गैर नाही, उलट अर्थव्यवस्थेला फायदा - उदयनराजे भोसले

राज ठाकरेंनी आपली ताकद, पक्षाची सध्याची स्थिती सत्तेपर्यंत जाण्यासाठी पुरेशी नसल्याचे पहिल्या सभेतच जाहीर करून टाकले. हे आपण प्रामाणिकपणे सांगत असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी विरोधक हा त्यांचा हतबलपणा असल्याचे म्हणत आहेत. जाहीर सभांमधून राज ठाकरे लोकांना आक्रमक होण्याचे आवाहन करत आहेत. थंड लोकांचे नेतृत्व करणे आपल्याला आवडत नसल्याचे ते म्हणत आहेत. कोणा एखाद्या व्यक्तीवर टीका करण्याऐवजी ते महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज का आहे, ते लोकांना सांगत आहेत. ही त्यांची भूमिका लोकांना कितपत पटते आणि त्यांच्या उमेदवारांना लोक किती प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सोशल मीडियावर राज ठाकरेंची क्रेझ -

लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे राज ठाकरे प्रत्येक सभा फेसबुकवरून लाईव्ह करत आहेत. त्यांच्या या लाईव्ह सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लाईक्स आणि कमेंटवरून दिसून येते. राज ठाकरे काय बोलतात हे त्यांचे चाहते आणि विरोधकही पाहत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेले लोक प्रत्यक्ष किती मतदान करतात हा प्रश्न आहे. ग्रामीण-खेडोपाड्यातून शहरात आलेल्या तरुणांमध्ये राज ठाकरेंची विशेष क्रेझ आहे, असे दिसते. मात्र, मनसेचे बहुतांश उमेदवार हे शहरी भागातील आहेत. ग्रामीण भागात मनसेचा उमेदवारच नसल्याने त्यांची इच्छा असूनही त्यांना मतदान करता येत नाही, असे चित्र आहे.

हेही वाचा - मला मोदी-शाहांची काळजी वाटते, झोपेतसुद्धा ते माझ्या नावाने चवताळून उठत तर नसतील ना? - पवार

Intro:Body:

ठाकरेंच्या 'राज'सभांची गर्दी मतांमध्ये रूपांतर होणार का?

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस उरले आहेत. राज्यातील सर्वच पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. गेल्या अनेक निवडणुकांपासून सातत्याने पिछाडीवर जात असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या सभांना नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यांच्या सभांना माणसं गोळा करण्याची वेळ पडत नाही. जेथे सभा असेल तेथे हाऊसफुल्ल गर्दी दिसून येते. पण, या गर्दीचे मतात रूपांतर किती होणार हा प्रश्न आहे.

या निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी टीका केली आहे. एकादा नेता सभागृहात सक्षम विरोधी पक्षनेता होण्यासाठी मतदान मागत असल्याची ही पहिलीच वेळ असावी. यावर काहीजण त्यांच्या पक्षात उभारी घेण्याची ताकद नसल्याचे म्हणत आहेत. मात्र, राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक सभेमधून महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज का आहे. बहुमतातील सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष किती गरजेचा असल्याचे ते विविध कारणे देत पटवून सांगत आहेत. 

राज ठाकरेंनी आपली ताकद, पक्षाची सध्याची स्थिती सत्तेपर्यंत जाण्यासाठी पुरेशी नसल्याचे पहिल्या सभेतच जाहीर करून टाकले. हे आपण प्रामाणिकपणे सांगत असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी विरोधक हा त्यांचा हतबलपणा असल्याचे म्हणत आहेत. जाहीर सभांमधून राज ठाकरे लोकांना आक्रमक होण्याचे आवाहन करत आहेत. थंड लोकांचे नेतृत्व करणे आपल्याला आवडत नसल्याचे ते म्हणत आहेत. कोणा एखाद्या व्यक्तीवर टीका करण्याऐवजी ते महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची गरज का आहे, ते लोकांना सांगत आहेत. ही त्यांची भूमिका लोकांना कितपत पटते आणि त्यांच्या उमेदवारांना लोक किती प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सोशल मीडियावर राज ठाकरेंची क्रेझ -

लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे राज ठाकरे प्रत्येक सभा फेसबुकवरून लाईव्ह करत आहेत. त्यांच्या या लाईव्ह सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे लाईक्स आणि कमेंटवरून दिसून येते. राज ठाकरे काय बोलतात हे त्यांचे चाहते आणि विरोधकही पाहत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेले लोक प्रत्यक्ष किती मतदान करतात हा प्रश्न आहे. ग्रामीण-खेडोपाड्यातून शहरात आलेल्या तरुणांमध्ये राज ठाकरेंची विशेष क्रेझ आहे, असे दिसते. मात्र, मनसेचे बहुतांश उमेदवार हे शहरी भागातील आहेत. ग्रामीण भागात मनसेचा उमेदवारच नसल्याने त्यांची इच्छा असूनही त्यांना मतदान करता येत नाही, असे चित्र आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.