ETV Bharat / state

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; काय आहे कारण? वाचा सविस्तर

Raj Thackeray Meet Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (2 डिसेंबर) वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

Raj Thackeray meet Chief Minister Eknath Shinde
राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 2, 2023, 2:06 PM IST

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट

मुंबई Raj Thackeray Meet Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीवरून राजकीय तर्क-वितर्कही काढले जात आहेत. दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट झाली. दरम्यान, बैठकीनंतर मुख्यमंत्री कार्यालयातून या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. मुख्यमंत्री कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, राज ठाकरे यांनी टोल बूथ आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली.

'या' मुद्द्यावरही झाली चर्चा : यासंदर्भात मनसेतील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आणखी एक मुद्दा चर्चेला आला तो म्हणजे कल्याण, डोंबिवली लोकसभेचा. या बैठकीत कल्याण डोंबिवली लोकसभेसाठी राज ठाकरे यांनी स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. सध्या या लोकसभेच्या जागेवर एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच राजू पाटील यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती. याबाबत देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

भेटीचे काय परिणाम होणार : या मतदारसंघात भाजपा आपल्याशी कुरघोडी करत असल्याच्या टीका आणि जाहीर नाराजी अनेकदा शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवली आहे. तर, भाजपानं देखील अनेकदा या भागात जाऊन मतदारसंघाची चाचपणी केलीय. त्यातच या मतदारसंघात मनसेचे देखील मतदार मोठ्या प्रमाणात असल्यानं मनसे देखील या जागेवर लढण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीतून नेमकं काय निष्पन्न होतं हे येत्या निवडणुकीतच स्पष्ट होईल.

दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना टोल बूथ आणि मराठी पाट्या या दोन मुद्द्यांना घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल असं चित्र आहे. तर, दुसरीकडं इतर पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीत आहेत. मात्र, यात सर्वांचे लक्ष लोकसभेच्या निवडणुका, कल्याण डोंबिवली मतदारसंघात उमेदवार कोण असेल? कुठल्या पक्षाचा असेल? याकडं लागलंय.

हेही वाचा -

  1. सरकार नुसतं तोंड वाजवायलाच’, राज ठाकरे यांचा मराठी पाट्यांवरुन हल्लाबोल
  2. तीन दिवसांत पाट्या बदला; अन्यथा राज ठाकरेंचा आदेश असल्यास 1 तासात 'खळ्ळ-खट्याक'चा मनसेचा इशारा
  3. Raj Thackeray Met CM : टोल प्रकरणी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, 'शिवतीर्थ'वर होणार निर्णायक बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.