ETV Bharat / state

Raj Thackeray: अटकेची टांगती तलवार; राज ठाकरे यांची उच्च न्यायालयात धाव, गुरुवारी होणार सुनावणी

author img

By

Published : Mar 23, 2023, 1:30 PM IST

सांगलीतील न्यायालयाच्या आजामीनपात्र वॉरंटला आव्हान करत राज ठाकरेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्थानिक इस्लामपूर सत्र न्यायालयाने राज ठाकरेंच्या विरोधात बजावलेला समन्स आला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

Raj Thackeray
राज ठाकरे यांची उच्च न्यायालयात धाव

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 2008 मध्ये मनसे वतीने आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे पडसाद म्हणून सांगली या ठिकाणी हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात हिंसा केली गेली. असा आरोप राज ठाकरे यांच्यावर केला होता. तेव्हा सांगली जिल्ह्यात कोकरूड या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला. त्या जुन्या केस प्रकरणी शिराळा येथील न्यायदंडाधिकारी यांच्याकडून 4 फेब्रुवारी या दिवशी बजावलेल्या जामीन पत्र वॉरंट इस्लामपूर सत्र न्यायालयाने कायम ठेवले. ते वॉरंट कायम असल्याने राज ठाकरेंविरुद्धच्या त्या वॉरंट विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी धाव घेतली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

राज ठाकरे यांना अटक: महाराष्ट्रातील परप्रांतीय विरोधात 2008 यावर्षी ठिकठिकाणी आंदोलन मनसेच्या वतीने करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंवर कार्यकर्त्यांना चितावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर याचा निषेध म्हणून ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. कथितरित्या सांगलीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास सांगितल्याचा देखील आरोप केला गेला होता. या अशा आंदोलनामुळेच त्या भागात जमाबंदीचा आदेश लागू केला गेला होता. मात्र जमाबंदीचा आदेश कार्यकर्त्यांनी जुमानला नाही. असा आरोप मनसेच्या विरोधात ठेवला गेला.

दहा जणांवर आरोप पत्र दाखल: जमाबंदीचा आदेश दिल्यानंतर देखील राज ठाकरे तुम्ही पुढे चला, या पद्धतीच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे त्यावेळच्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी काही कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती. राज ठाकरे यांनी त्यांना चितावणी दिली. या मुख्य आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा देखील नोंदवला होता. राज ठाकरे यांच्यासोबत इतर दहा जणांवर आरोप पत्र दाखल केले होते.

उच्च न्यायालयामध्ये धाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीचा आदेश झुगारून हे आंदोलन केले होते. या आंदोलनाला चितावणी राज ठाकरे यांनी दिल्याचा कथित आरोप होता. त्याबाबत गुन्हे देखील नोंदवले गेले होते. त्यामुळेच याबाबत आरोप पत्र दाखल झाल्यानंतर स्थानिक न्यायदंडाधिकारी यांनी त्याची दखल घेत कायदेशीर प्रक्रिया म्हणून वॉरंट जारी केले होते. याबाबत इस्लामपूर सत्र न्यायालयांमध्ये मनसेकडून अर्ज देखील केला गेला होता. मात्र आधीच्या न्यायालयाचे वॉरंट कायम ठेवल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये राज ठाकरे यांनी धाव घेतलेली आहे. या फौजदारी याचिके संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. या संदर्भात राज ठाकरे यांची बाजू अधिवक्ता अर्जित साखळकर हे मांडणार आहेत.

फेरविचाराचा अर्ज फेटाळण्यात आला: राज ठाकरे यांच्यावतीने या याचिका मधील हा मुद्दा नमूद करण्यात आलेला आहे की, 3 फेब्रुवारी रोजी इस्लामपूर सत्र न्यायालयात केलेला फेरविचाराचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी न्यायदंडाधिकारी न्यायालयात नियमित सुनावणी होणार होती. त्यावेळी सत्र न्यायालय जो आदेश दिला होता. त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहे. त्यामुळे तेथील हजेरी वेळेला उपस्थित राहता येणार नाही. त्या संदर्भातली सूट मिळावी अशी देखील मागणी याचीकेमध्ये नमूद आहे.

हेही वाचा: Majar in Mahim Sea राज ठाकरेंच्या अल्टीमेटमनंतर माहिममधील अनधिकृत मजारीवर बीएमसीची कारवाई सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.