ETV Bharat / state

रेल्वे कर्मचारी कोरोना प्रतिबंधक लसीपासून वंचीत

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असून सर्व राज्यातील शासकीत कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, कोरोना काळात गेल्या एका वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Mar 29, 2021, 4:24 PM IST

Updated : Mar 29, 2021, 9:45 PM IST

मुंबई - कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असून सर्व राज्यातील शासकीत कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, कोरोना काळात गेल्या एका वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये, यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली नाही. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहेत.

आढावा घेताना प्रतिनिधी

रेल्वेकडून राज्याकडे पाठपुरावा

कोरोना काळात पश्चिम आणि मध्य रेल्वेचे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहे तर आता पावसाळ्या पूर्वीची दुरुस्तीचे कामे कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सज्ज व्हायचे आहे. त्यामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेचे महाराष्ट्रातील तब्बल एक लाखापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर कोरोन प्रतिबंधक लस देण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. नुकतेच पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य आरोग्य संचालकांनी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान मुख्य सचिवांना पत्र लिहून कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मागणी केली आहे. मात्र, आतापर्यंत राज्य सरकारकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. रेल्वेकडून सतत पाठपुरावा सुरू असल्याची माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, रेल्वे कर्मचारी कोरोनाचा धोका असतानाही चोवीस तास अविरतपणे प्रवाशांना सेवा देत आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना पावसाळ्याच्या तोंडावरील दुरुस्तीचे काम करायची आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच त्यांच्याकडून नागरिकांसाठी योग्य प्रकारे सेवा देता यावी यासाठी त्यांचे लसीकरण करणे फार गरजेचे आहे. सध्या रेल्वेच्या भायखळा रुग्णालय आणि जगजीवन रामा रुग्णालयामध्ये दररोज शंभर पेक्षा जास्त कोरोना चाचणी केली जात आहे. 50 ते 60 रेल्वे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने रेल्वेने तत्काळ कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात यावीत. रेल्वेकडून पत्र व्यवहार केल्याची माहिती आम्हाला दिली आहे. आम्ही संघटनेकडून सुद्धा मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे.

राज्य सरकारला पत्र

कोविड रुग्णालय म्हणून जगजीवन राम रुग्णालयात निवड भारतीय रेल्वेकडून करण्यात आलेली होती. गेल्या एका वर्षात रेल्वे कर्मचाऱ्यांची कोविड चाचणीही या रुग्णालयात सुरू केली होती. या रुग्णालयात लसी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात कस पुरवून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे तपासून त्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी पश्‍चिम रेल्वेचे प्रधान मुख्य आरोग्य संचालक डॉ. छत्रसिंह आनंद यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात केली आहे.

हेही वाचा - मुंबईत संचारबंदीची कडक अंमलबजावणी

Last Updated : Mar 29, 2021, 9:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.