ETV Bharat / state

Rahul Narvekar Foreign Tour : मुख्यमंत्र्यांपाठोपाठ विधानसभा अध्यक्षांची परदेशवारी रद्द, ठाकरे गटाची 'ती' चाल यशस्वी? - विधामसभा अध्यक्षांची परदेशवारी रद्द

Rahul Narvekar Foreign Tour : आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घाना या देशाच्या दौऱ्यावर जाणार होते. यावरुन विरोधकांनी टिकेची झोड उठवली होती. यानंतर आता राहुल नार्वेकरांनी आपला परदेश दौरा रद्द केला आहे.

Rahul Narvekar Foreign Tour
Rahul Narvekar Foreign Tour
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 11:37 AM IST

मुंबई Rahul Narvekar Foreign Tour : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा घानाचा परदेश दौरा रद्द केला. घानामध्ये पार पडणाऱ्या ६६ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेस राहुल नार्वेकर हजेरी लावणार होते. पण, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलाय. ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधित ही परिषद भरवण्यात आली असून राहुल नार्वेकर यांचा दौरा रद्द करण्यामागचं कारण अजूनही अस्पष्ट असलं, तरी ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अफिडेव्हिटनंतर नार्वेकरांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा सुरु आहे.

इतर देशांच्या संसदेचा अभ्यास : घाना इथं ३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर दरम्यान ६६ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद पार पडत आहे. यासाठी लोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला हे परदेश दौऱ्यावर जाणार असून त्यांच्यासोबत काही राज्याचे विधानसभा अध्यक्षही जाणार होते. त्यात महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचाही समावेश होता. या परिषदेत इतर देशांच्या संसदेचा अभ्यास करण्याबरोबरच काही विचारांची देवाण-घेवाण केली जाणार होती. पण, सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हा दौरा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी केला परदेश दौरा रद्द : घाना इथं ३० सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी राहुल नार्वेकर रवाना होणार होते. परंतू सध्या महाराष्ट्रातील आमदार अपात्रतेची सुनावणी प्रलंबित असताना राहुल नार्वेकर घानाला जाणार असल्यानं विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेचं मुखपत्रातून सुद्धा राहुल नार्वेकरांच्या घाना दौऱ्यावरुन टीका करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकरांनी आपला परदेश दौरा रद्द केला आहे. यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपला जर्मनी, लंडनचा १० दिवसांचा दौरा रद्द केला होता. हा दौरा रद्द करण्यामागंही सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली गेली होती.

सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र : आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर यांच्याकडून चालढकलपणा सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येतोय. यावरुन सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांवना सुनावल्यावरही तारखांचा खेळ सुरु आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असूनही ते प्रक्रिया लांबवत आहेत. याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलंय. यानंतर राहुल नार्वेकरांनी आपला घाना दौरा रद्द केल्याचं सांगितलं जातंय.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut On Rahul Narvekar : राज्यात लोकशाहीचा खून, 'ते' मात्र लोकशाही मजबुतीसाठी विदेशात; संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. Rahul Narvekar Foreign Tour : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर
  3. MLA Disqualification Hearing: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटांना नोटीस, सोमवारी 3 वाजता होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.