मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील 'भारत जोडो यात्रे'चा १४ दिवसांचा ( Look Back 2022 ) टप्पा हा चांगलाच वादग्रस्त झाला ( Year Ender 2022 ) होता. यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ( Rahul Gandhi Controversial Statement on Savarkar ) संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले ( Controversial Statement on Savarkar ) होते. एवढेच काय तर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात थांबवा, अशी मागणीदेखील राज्य सरकारकडे केली. त्यामुळे राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला महाराष्ट्रात थांबवले जाणार का, अशी राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चेनंतर काँग्रेस पक्षदेखील तेवढाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला.
- राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील 'भारत जोडो यात्रा' ७ नोव्हेंबरला नांदेड येथील देगलूर जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला सुरुवात झाली. देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासमोर हजारो लोकांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांना अभिवादन करून राहुलजी व भारतयात्रींनी हजारो मशाली हाती घेत यात्रेला सुरवात.
- या पाच जिल्ह्यांतून 14 दिवस या यात्रेचा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास राज्यातील नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांतून 14 दिवस ही यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गावर राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील यात्रा सुरळीत व्हावी यासाठी 300 अधिकारी आणि जवळपास दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त या यात्रेदरम्यान होता.
- आदित्य ठाकरे हिंगोली जिल्ह्यात 'भारत जोडो यात्रे'त झाले सामील 11 नोव्हेंबरला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यात 'भारत जोडो यात्रे'त सामील होत राहुल गांधी यांना साथ दिली. देशातील दोन महत्त्वाचे नेते या दिवशी एकत्रित आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांणा नाही उधाण आले होते. 16 नोव्हेंबरला वाशिम येथे झालेल्या सभेदरम्यान राहुल गांधी यांनी आदिवासी बांधवांसोबत घेतलेल्या सभेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातले राजकारण तापले होते. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली, तसेच त्यांच्याकडून पेन्शन घेतली असल्याचे सभेदरम्यान वक्तव्य केल्याने राज्यभरात असंतोष पसरला आहे.
- विरोधी पक्षाकडून राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात थांबवण्याची मागणी 17 नोव्हेंबरला अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत सावरकरांनी इंग्रजांसमोर कशी माफी मागितली याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलने केली. तसेच, राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 28 नोव्हेंबरला राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनी दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.