मुंबई: मुंबईची लाईफ लाईन म्हणून रेल्वेच्या लोकलची ओळख आहे.मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मान्सूनपूर्व कामांना गती आली आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना लोकलने प्रवास करीत असताना कोणत्याही त्रासाला सामोरे जाता कामा नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे कडून मान्सूनपूर्व कामे प्रगतीपथावर सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे आघाडीवर: मुंबई शहर आणि उपनगरात लोकलची मान्सून पूर्व तयारी कामांमध्ये मध्य रेल्वेणे बाजी मारली आहे. जवळपास सर्वच कामे पूर्ण झाली झाली आहे. पश्चिम रेल्वेचे देखील 80 टक्के कामे पूर्ण झाली आहे. वेळ आधी कामे पूर्णत्वास घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या होत. पावसात ज्या ठिकाणी रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो अशा असुरक्षित ठिकाणी 24 लक्ष ठेवले जाणार आहे.
हाती घेतलेली कामे: पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे.पश्चिम आणि मध्य रेल्वेची सेवा पावसाळ्यात सुरळ, विनाव्यत्यय सुरु रहावी या पार्श्वभूमी वरती कामे सुरू आहे. गाळ काढणे, कल्व्हर्ट आणि नाले साफ करणे, झाडाची छाटणी करणे , खड्डे स्कॅन करणे, पाणी साचणारी असुरक्षित असलेल्या ठिकाणी उच्च वॅटेज पंपची व्यवस्था करणे, मल्टी- सेक्शन डिजिटल काउंटर तयारी केलीय. मुंबई शहर आणि उपनगरातील ट्रक 80% नाल्यांची साफसफाईचे काम झाले आहे. कल्व्हर्ट्स स्वच्छ केले जातं आहे. काही ठिकाणी झाडांची छाटणी आणि कापणी करण्याचे काम सुरु आहे.
मान्सूपूर्व कामे आटोपली: पावसाळा सुरू होण्याआधीच मध्य रेल्वे कडून मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व कामे सुरू केले जातात.आजपर्यँत जवळपास 90 टक्के कामे पूर्ण झाले आहे.दरवर्षी निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊनच कामांचे नियोजन केले जाते.शिल्लक कामे देखील याच आठवडयात पूर्ण केली जाणार असल्याची माहिती रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली
तुंबणाऱ्या पाण्यावर ड्रोनची नजर: पश्चिम रेल्वे कडून चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान लोकलला पावसाळ्यामुळे ज्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो अशी ठिकाणे आम्ही शोधले आहे. त्याठिकाणी उपायोजना देखील केले आहे. झाल्याची सफाई देखील आमची संपूर्ण आटोपली आहे. रेल्वे पटरी जवळ पाणी बाहेर काढण्यासाठी अनेक ठिकाणी मोठे पंप ठेवले आहे. अनेक ठिकाणी आम्ही नवीन ब्रिज उभारले आहे. रेल्वे पटरी परिसर आणि रेल्वे स्थानकात पावसाळ्यामुळे तुबणाऱ्या पाण्याला बाहेर काढण्यासाठी हाय पावर पंपांचा वापर केला जाणार आहे.204 पंप सुसज्ज केले आहे. अचानक ज्यादा पावसामुळे पाणी तुंबले तर यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.