ETV Bharat / state

PM Narendra Modi Pune Visit : दोन महिन्यात पंतप्रधान दुसऱ्यांदा पुणे दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीपूर्वी विशेष लक्ष

PM Narendra Modi Pune Visit : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने महाराष्ट्रात मिशन ४५ टार्गेट आखले आहे. गणपती दर्शनाच्या निमित्तानं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दोनच दिवसापूर्वी हे पुण्यात येऊन गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ ऑक्टोबरला पुण्याचा दौरा करणार आहेत.

PM Pune visit
PM Pune visit
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 1:51 PM IST

Updated : Oct 1, 2023, 2:54 PM IST

मुंबई/पुणे : PM Narendra Modi Pune Visit : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय भाजपा नेतृत्वाकडून महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मुख्यतः भाजपा नेत्यांकडून केंद्रस्थानी पुणे जिल्हा आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पुणे दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील ऑक्टोंबर महिन्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या पुण्याच्या १ ऑगस्टच्या दौऱ्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या २ मार्गांचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले होते. तसेच त्यांच्या हस्ते चांदणी चौक पुलाचे लोकार्पणही केले गेले होते.

सुशिक्षित मतदार संघाचा जिल्हा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गत २ महिन्यांतील हा दुसरा पुणे दौरा असणार आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडी पाहता पुणे जिल्हा हा भाजपाच्या केंद्रस्थानी आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार या दोघांनी या जिल्ह्यावर विशेष लक्ष ठेवले आहे. सुशिक्षित मतदार संघाचा जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते.

महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा- मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑक्टोबर रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते पुण्याच्या लोहगाव विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर विमान प्रवाशांच्या सेवेत लवकरच हे टर्मिनल दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा टर्मिनल उद्घाटनाच्या निमित्तानं असला तरी, त्यात अनेक महत्त्वाच्या राजकीय मुद्यांवर खलबते होणार असल्याचीही चर्चा आहे. विदर्भातील अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी पुढील १५ ते २० दिवसांत शरद पवार भाजपासोबत जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार असल्यामुळे त्यांच्या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी गटात सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे. या सर्वात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची आहे.

भाजपाचं मिशन ४५- सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपानं महाराष्ट्रात मिशन-45 प्लस मोहीम राबवली आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गत १, ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र यांच्या पाठोपाठ गृहमंत्री अमित शाहा, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा हेही पुणे दौऱ्यावर येऊन गेले. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंदाची बैठकही नुकतीच पुण्यात पार पडली. अशात येत्या ५ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी पुन्हा पुण्यात येत असल्याने भाजपा आपल्या नियोजित मिशन 45 च्या दिशेनं पावले टाकताना दिसून येत आहे.

हेही वाचा-

  1. PM Modi Telangana Visit : विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर; 13500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण
  2. Youth Jump In PM Convoy : सुरक्षेत मोठी चूक; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यात घुसला तरुण, पोलिसांचा हलगर्जीपणा नडला

Last Updated : Oct 1, 2023, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.