मुंबई - मुंबईतील पेप्सिको कंपनीतील कामगारांनी आज १ मेच्या कामगार दिनाचे औचित्य साधूनच आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भारत सरकारच्या एका आदेशानुसार कोणत्याही प्रायव्हेट मल्टी नॅशनल अथवा सरकारी कंपनी, संस्था, हॉटेल किंवा अन्य संस्थांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दरमहा २४ हजार रुपये भत्ता दिला पाहिजे, असा नियम सरकारच्या राजपत्रात आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून पेप्सिको कंपनीत जे कामगार काम करत आहेत. त्यांना अवघे १२ हजार रुपये पगारावर काम करावे लागत आहे.
त्यामुळे आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पेप्सीको इंडिया कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी रे रोड येथील एका ब्रँचमध्ये काम बंद बेमुदत आंदोलन केले आहे.अनेक वर्षांपासून त्यांना आहे त्याच पगारात राबवले जात आहे. कंपनी स्वत:च्या फायद्याचा विचार करते. मात्र कामगारांना योग्य मोबदला देत नाही. त्यामुळे आज पेप्सिको कामगारांनी आंदोलन पुकारले आहे. जर लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाही, तर पुढे संपूर्ण देशभर कामगार आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी पेप्सीको कंपनीला व संबंधित व्यस्थापन कंपन्यांना दिला आहे.
पेप्सिको कामगारांच्या मागण्या -
1) कंपनीत पॅरोलवर नोकरीसाठी घेणे
2) कंपोझिशन इंट्रेस
3) ऑन सेक्युरिटी डिपॉझिट
4) मागील तीन वर्षांचे सॅलरी इंक्रीमेंट देण्यात यावे
5) आर. ए. डी. ए. जॉईन जुनी असावी आणि समान पगार
6) कमिशन वाढवावे
7) अपघात झाल्यास कंपनीने जबाबदारी घ्यावी
अशा एकूण वीस मागण्या घेऊन पेप्सिको कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.
वर्षानुवर्षे काम करून त्यांना सोयीसुविधा मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. वेळोवेळी कंपनीची व व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार व आपले प्रश्न मांडून त्यावर कोणताच तोडगा काढलेला नाही. त्यामुळे काही वेळा आंदोलने केली. परंतु त्याचा कोणताही परिणाम कंपनीवर पडला नाही, उलट कामगारांचेच नुकसान झाले. त्यामुळे आत्ता जे आंदोलन केले आहे, ते मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे घेणार नसल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. तसेच उद्या अंधेरी येथील पेप्सिको कंपनीची सब ब्रांच बंद ठेवणार असून देशभरातील सर्व संतप्त कामगार यापुढे बंदात सहभागी होतील याची कंपनीनेदखल घ्यावी, असाही इशारा त्यांनी कंपनीला दिला आहे.