ETV Bharat / state

कोरोनामुळे रेल्वेकडून विशेष गाड्या, प्रवाशांना भूर्दंड

कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीपासून भारतील रेल्वेने नियमीत रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत. त्याऐवजी विशेष गाड्या रेल्वेकडून सोडण्यात येत आहेत. या गाड्यांचे तिकीट दर नियमित गाड्यांपेक्षा १.३ पट जास्त असून ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना मिळणारे तिकीट सवलतही विशेष गाड्यांना लागू होत नाही. यामुळे प्रावाशांना नाहक भूर्दंड बसत आहे.

रेल्वे विशेष
रेल्वे विशेष
author img

By

Published : Jun 6, 2021, 9:33 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद केली होती. नंतर जून, 2020 पासून हळहळू नियमित गाड्याऐवजी विशेष गाड्या देशभरात भारतीय रेल्वेकडून चालविण्याची सुरुवात झाली आहे. आज कोरोनाला दीड वर्षे होत असतानाही भारतीय रेल्वेच्या नियमित गाड्यांना नवीन क्रमांक देऊन विशेष भाड्यावर चालविण्यात येत आहे. कोरोना आणखी दोन वर्षे राहिला तर दोन वर्षात हे असेच जास्तीचे दर घेणार का, असा प्रश्न सर्व सामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे.

रेल्वे प्रवाशांची लूट...?

कोरोना महामारीच्या संकटात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद झालेल्या बहुतांश रेल्वे आता सुरू झाल्या आहेत. मात्र, नियमित गाड्याऐवजी मेल-एक्स्प्रेसच्या नंबरमध्ये बदल करून विशेष भाड्याने या गाड्या आज देशभरात धावत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाऊनमुळे आगोदरच कंबरडे मोडले आहे. यात प्रत्येक बाबींचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. सामान्य नागरिकांना परवडणारी रेल्वेचे तिकीट देखील विशेष गाड्याचा नावावर वाढविण्यात आले आहे. कोरोनामुळे गर्दीचे नियोजन व्हावे, यासाठी अनेक अटी आणि नियम लागू केले आहे. मात्र, यातून रेल्वे प्रवाशांची लूट होत आहे, असा आरोप प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे. रेल्वेचे ज्येष्ठांना आणि इतर प्रवाशांना मिळणारे सवलतीचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे त्यांना जादा भाडे द्यावे लागते. रेल्वेने आता कोरोनामुळे विशेष गाड्याऐवजी नियमित गाड्या चालविण्याची मागणी जोर धरत आहे.

३१ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ

कोकण रेल्वेने ऑक्टोबर, २०२० मध्ये १०१११ / १०११२ कोकणकन्या एक्सप्रेसच्या वेळेत चालणारी ०११११ / ०१११२ मडगाव मुंबई फेस्टिवल स्पेशल व नोव्हेंबर, २०२० मध्ये १०१०३ / १०१०४ च्या ऐवजी ०१११३ / ०१११४ मडगाव मुंबई फेस्टिवल स्पेशल ह्या गाड्या सुरू केल्या आहेत. आजच कोकण रेल्वेने या गाड्यांना ३१ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. म्हणजे वर्षभर या गाड्या नियमित असूनही "विशेष गाड्या - विशेष भाडे" या नावाखाली सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांची फसवणूक असल्याचे मत प्रवासी संघटनेकडून व्यक्त केले जात आहे.

नियमित भाड्यापेक्षा १.३ पट भाडे

प्रवाशांना नियमित भाड्यापेक्षा १.३ पट भाडे देऊन प्रवास करावा लागतो. तसेच, स्लीपर क्लाससाठी किमान ५०० किलोमीटरचे भाडे द्यावे लागते. त्यातच ज्येष्ठ नागरिक सवलतदेखील बंद आहे. हा प्रवाशांवर अन्याय आहे. संबंधितांनी लक्ष घालून विशेष गाड्या म्हणून सुरू असलेल्या सर्व नियमित गाड्या नियमित भाड्यावरच चालवाव्यात अन्यथा प्रवाशांचा उद्रेक झाल्यास त्यास रेल्वे प्रशासन कारणीभूत असेल, असे रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी सवलत बंद

गर्दी कमी करण्यासाठी नेहमीच्या प्रथेप्रमाणे उत्सव/सुट्टी विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ज्या मार्गावर अनेक उत्सव विशेष गाड्या चालू आहेत तिथे मागणी वाढली आहे. गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. 2015 पासून अशा गाड्यांचे भाडे थोडे जास्त ठेवण्यात आले आहे. तेव्हापासून हा नियम आहे. तसेच कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी वेगवेगळ्या सवलती ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी कोरोना काळात प्रवास टाळावा, यासाठीही तिकीट सवलत दिली गेली नाही, अशी माहिती रेल्वेकडून दिली आहे.

हेही वाचा - मुंबईत आज 794 नवे कोरोना रुग्ण, 20 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.