ETV Bharat / state

Pankaja Munde Met Dhananjay Munde : राजकीय वैर बाजुला ठेऊन पंकजा मुंडे या थेट ब्रीच कँडी रुग्णालयात ; धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस - Pankaja Munde met Dhananjay Munde

राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे ( NCP Dhananjay Munde ) व भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) नात्याने बहीण-भाऊ असले तरी त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. परळी मतदारसंघातील त्यांच्यातील लढती राज्यात लक्षवेधक लढत असते. हे दोन भाऊ-बहीण वेगवेगळ्या पक्षात असून राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र आज राजकीय वैर बाजुला ठेऊन पंकजा मुंडे यांनी थेट ब्रीच कँडी रुग्णालय ( Breach Candy Hospital ) गाठले व धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याचे फोटो व्हायरल होत आहेत.

NCP Dhananjay Munde
राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे
author img

By

Published : Jan 12, 2023, 9:38 AM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी धनंजय मुंडे यांच्या कारला परळीमध्ये मंगळवारी 3 जानेवारी 2023 रोजी रात्री अपघात झाला आहे. यामध्ये मुंडे यांच्या छातीला आणि डोक्याला मार लागला. या अपघातात मुंडेंच्या कारचंही मोठे नुकसान झाले. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आज पंकजा मुंडे यांनी त्यांची भेट घेतली. बहिणीने भावाची भेट घेतल्यामुळे आणि राजकीय मतभेद त्यांचे जग जाहीर असताना भेटीचे फोटो प्रसारित होत आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते एडवोकेट अमोल मातेले यांनी मत व्यक्त केले. ही तर महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार साहेबानी दिलेले संस्कार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते अमोल मातेले यांनी म्हटले आहे.

रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट : पंकजा मुंडे आणि धनजंय मुंडे यांच्यात असलेले राजकीय वैर सर्वश्रूत आहे. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन एकमेकांवर टीका करतात. पण, गरजेवेळी ते नेहमी एकमेकांच्या पाठीशीही उभे असल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. आताही राजकीय वैर विसरुन पंकजा मुंडे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेतली आहे. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करताना दिसत आहेत.

धनंजय मुंडे यांच्या वाहनास अपघात : दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या गाडीला मंगळवारी रात्री 12च्या सुमारास परळीमध्ये अपघात झाला होता. दुसऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती देण्यात आली होती. 'मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या वाहनास परळी शहरात वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अशी माहिती ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली होती.

राज्याची मराठमोळी संस्कृती : यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते एडवोकेट अमोल मातेलेख यांच्यासोबत संवाद साधला असता त्यांनी म्हटले की ,हे पहा राजकीय मतभेद आपल्याकडे असतात आणि राहिला मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती दुःखद घटना घडली किंवा एखाद्या घटना घडली तर एकमेकांच्या घरी नेते किंवा जनता भेटीला जातात भले कितीही राजकीय मतभेद असोत मत ही आपली राज्याची मराठमोळी संस्कृती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व शरद पवार साहेब यांनी आम्हाला ते शिकवलेल्या आहेत. त्यामुळे मुंडे साहेबांना त्यांच्यापर्यंत भेटायला आल्या भावानेच प्रेम सर्वोच्च आहे. शेवटी ते रक्ताचं नातं आहे.

आजारी असताना राजकारणाचा मुद्दा येत नाही : धनंजय मुंडे यांची आता प्रकृती स्थिर आहे. आपण गेले काही दिवस नाशिकमध्ये कामानिमित्त गेल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात येऊ शकले नाही. मात्र मुंबईत आल्यावर लगेचच आपण धनंजय मुंडे यांच्या भेटीला आलो असल्याचे भेटीनंतर प्रसार माध्यमाचे संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी माहिती दिली. तसेच गाडी चालवताना सावकाश गाडी चालवावी आता प्रेमळ सल्लाही दिला आहे. काही महिन्यापूर्वी धनंजय मुंडे यांना रुग्णालयात ऍडमिट केले होते. तेव्हा देखील आपण धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते. कोणीही आजारी असताना राजकारणाचा मुद्दा येत नाही हे आपली संस्कृती नाही असेही यावेळी पंकजा मुंडे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी केली होती तब्येतीची विचारपूस : यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तब्येतीची विचारपूस केली होती. परळी येथे झालेल्या भीषण अपघातात धनंजय मुंडे यांच्या सात आणि आठ नंबरच्या बरगड्यांना मार लागलेला आहे. फ्रॅक्चर झाला असल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले आहेत. धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असली तरी उपचारासाठी त्यांना अजून काही दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.

हेही वाचा : NCP Dhananjay Munde आमदार धनंजय मुंडे यांच्या वाहनाला अपघात मुंबईला हलविण्यात येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.