ETV Bharat / state

मुंबई विभाग : राजधानीचा 'किंगमेकर' कोण? - maharashtra assembly poll

२१ आक्टोबरला मतदान झाले असून आता 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. यात कोण गुलाल उधळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

मुंबई विभाग
author img

By

Published : Oct 23, 2019, 10:52 AM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार हे येत्या 24 ऑक्टोबरला स्पष्ट होईल. त्याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभेच्या जागा आहेत. मुंबईमध्ये कायमच शिवसेना आणि भाजपचे वर्चस्व राहिले आहे. शहरी भागात युतीचाच दबदबा मागील विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला होता.

हेही वाचा - मराठवाडा विभाग : मतदार राजा कोणासोबत?

2014 ची आकडेवारी -

  • भाजप - 15
  • शिवसेना - 14
  • काँग्रेस - 5
  • एमआयएम - 1
  • समाजवादी पार्टी - 1
  • एकूण - 36

2014 ची राजकीय परिस्थिती -

मुंबई हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मुंबई महानगरपालिकाही शिवसेनेच्या ताब्यात आहे. परंतु, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला 14 जागा मिळाल्या होत्या. तर, त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला 15 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या गडातही 2014 ला आकडेवारीच्या नजरेतून भाजपच सरस राहिला होता. तसेच त्यावेळी मोदी लाटेचा फायदाही भाजपला राजधानीत झाला होता.

हेही वाचा - पश्चिम महाराष्ट्र विभाग - कोण मारणार 'बाजी'?

2019 ची राजकीय परिस्थिती -

राजधानीत भाजप हा शिवसेनेला 2014 च्या निवडणुकीत सरस राहिला होता. सध्या मुंबईत सेना-भाजपमध्ये मेगाभरती झाली आहे. मनसे, राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते हे युतीत दाखल झाले आहेत. या मेगाभरतीमुळे खास करुन युतीचे एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर तिकीट वाटपातून दिसून आला होता. त्यामुळे काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार आहे. त्यामुळे मेगाभरतीचा फटका कोणाला बसतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा - 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'

लक्षवेधी लढत -

  1. वांद्रे पूर्व - विश्ववनाथ महाडेश्वर (शिवसेना) Vs तृप्ती सावंत (अपक्ष), झीशाँन सिद्दीकी (काँग्रेस)
  2. कुलावा - भाई जगताप (काँग्रेस) Vs राहुल नार्वेकर (भाजप)
  3. वरळी -आदित्य ठाकरे (शिवसेना) Vs सुरेश माने (राष्ट्रवादी)
  4. अणुशक्तीनगर - तुकाराम काटे (शिवसेना) Vs नवाब मलिक (राष्ट्रवादी)

दरम्यान, मतदान झाले असून आता 24 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. यात कोणाचा गुलाल उधळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

:

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.