मुंबई - मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. शुक्रवारी मुंबईत 57 हजार 390 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 12 लाख 66 हजार 387 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत शुक्रवारी 57 हजार 390 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 55 हजार 106 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 284 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 12 लाख 66 हजार 387 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 11 लाख 09 हजार 931 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 56 हजार 456 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 49 हजार 926 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 59 हजार 707 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 76 हजार 688 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 1 लाख 80 हजार 66 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर शुक्रवारी 30 हजार 6 तर आतापर्यंत 8 लाख 42 हजार 219 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी 4 हजार 191 लाभार्थ्यांना तर एकूण 71 हजार 537 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 23 हजार 193 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 3 लाख 52 हजार 631 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
- आरोग्य कर्मचारी - 2 लाख 49 हजार 926
- फ्रंटलाईन वर्कर - 2 लाख 59 हजार 707
- जेष्ठ नागरिक - 5 लाख 76 हजार 688
- 45 ते 59 वय - 1 लाख 80 हजार 066
- एकूण - 12 लाख 66 हजार 387
हेही वाचा - चिंताजनक! मुंबईत महिनाभरात कोरोनाचे ४६ हजार सक्रिय रुग्ण वाढले
हेही वाचा - धारावीतील कोरोनाला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत ५ हजार रुग्णांची नोंद, ६९४ सक्रिय रुग्ण