ETV Bharat / state

Ajit Pawar Praises On Narendra Modi : नरेंद्र मोदींनी करुन दाखवला करिश्मा, अजित पवारांनी उधळली स्तुतीसुमने - भाजप

राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगलीच स्तुतीसुमने उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar Praises On Narendra Modi
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 22, 2023, 11:28 AM IST

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. अजित पवार भाजपसोबत सलगी करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आता करण्यात येत आहे. त्यातच अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात करिश्मा करुन दाखवला असून 1984 नंतर त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले अजित पवार : भाजपने देशात 2014 आणि 2019 मध्ये पूर्ण बहुमत मिळवून सत्ता ताब्यात घेतली आहे. मात्र पूर्ण बहुमत इतर कोणत्याही नेत्याला मिळवणे जमले नाही. भाजपकडे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी असे दिग्गज नेते असतानाही त्यांना पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करता आले नाही, तो करिश्मा नरेंद्र मोदींनी करुन दाखवला. त्यामुळे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यश असून त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदींचा करिश्मा देशात चालल्याने भाजप देशभरात पसरल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर कोण : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पिंपरी चिंचवडच्या एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात चांगलीच स्तुतीसुमने उधळली. देशात 1984 नंतर पहिल्यांदा 2014 ला पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनाही पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करता आले नाही. हा करिश्मा नरेंद्र मोदी यांनी करुन दाखवला. मात्र नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण असा जर प्रश्न विचारला, तर कोणाचेही नाव पुढे येत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे अजित पवारांच्या या सडेतोड बोलण्याने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.

अजित पवारांची भाजपसोबत जवळीक : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत. आपल्या कुटुंबियातील सदस्यांवर पक्ष सोडण्याबाबत दबाव असल्याचे खुद्द शरद पवारांनी आपल्याला सांगितल्याचा दावा संजय राऊतांनी केल्यानंतर या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यानंतर अजित पवार मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला हजर न राहता, पुण्यातील एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगली. मात्र आपण एकावेळी एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो. त्याबाबत आपण पक्षाला अगोदरच कळवल्याचे स्पष्ट करुन अजित पवारांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

हेही वाचा - Ajit Pawar Claim CM Post Now : अजित पवारांचे मोठे विधान; आताच मी मुख्यमंत्री होऊ शकतो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.