मुंबई - चेंबूरमध्ये घरातच गांजाचे उत्पादन घेणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ३ ने अटक केली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांमध्ये अमलीपदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले असून चरस, गांजासारख्या अमलीपदार्थांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी विशेष कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयांच्या चरस गांजा सारखे अंमलीपदार्थ जप्त केले आहेत.
हेही वाचा - भांडुपमध्ये नशेखोरांविरोधात मनसेचा मोर्चा
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक 3 ने केलेल्या कारवाईत चेंबूर परिसरात घरातच गांजाचे उत्पादन घेणाऱ्या आरोपीला धाड टाकून अटक केली आहे. यूट्युब आणि इंटरनेटवरून 'हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम'च्या तंत्रज्ञानाचा वापर करून निखिल शर्मा (वय २६) या आरोपीने त्याच्या मित्राच्या घरात गांजाची रोपे लावून गांजाचे उत्पादन घेत होता. पोलिसांनी निखिल शर्मा आरोपीकडून १ किलो गांजासह ५९ ग्रॅम एमडी ड्रग्ज असे २ लाख ९० हजारांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत.
हेही वाचा - जामिया विद्यापिठातील विद्यार्थी लाठीमारप्रकरणी TISS च्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
पोलिसांनी घटनास्थळावरून तीन हायड्रोपोनिक्स ग्रो सिस्टम चे टेंट, टायमर यंत्रणा, पीएच ऑइल टेस्टर, बी रोपणासाठी लागणारे पेपर टॉवेल, आद्रता मापक, एलईडी लाइट्स, हायड्रोपोनिक न्यूट्रियंट्स, असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काय आहे हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम -
हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम हे अशा प्रकारचे तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची माती न वापरता रोपट्यांचे उत्पादन हे केवळ पाणी आणि इतर पोषक तत्त्वांवर घेता येते. या तंत्रज्ञानात खूपच कमी पाण्याचा वापर केला जातो. कुठल्याही प्रकारची खते किंवा कीटकनाशके यामध्ये वापरली जात नाहीत. या तंत्रज्ञानातून घेण्यात येणाऱ्या उत्पादनासाठी मर्यादित जागा सुद्धा पुरेशी असते.
हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : प्रवीण दरेकरांची विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी निवड, सुभाष देसाईंनी मांडला अभिनंदन प्रस्ताव
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील कुलाबा परिसरांमध्ये टुरिस्ट गाईडचे काम करणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. टूरिस्ट गाईडच्या नावाखाली हा आरोपी परदेशी पर्यटकांना अमलीपदार्थ पुरवीत होता. तर अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या वरळी युनिटने केलेल्या कारवाईत फातिमा शेख या महिलेकडून तब्बल ९ लाख रुपयांचा २३ किलो गांजा जप्त केला आहे.