मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका डॉ. विद्या बाळ यांच्या निधनाने भारतीय महिला चळवळीचे खंदे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. विद्या बाळ यांनी पेटवलेल्या वातींच्या आज लखलखत्या मशाली झालेल्या दिसत असल्याचेही पवार म्हणाले.
-
न्याय्य हक्कांपासून वंचित स्त्री-समूहाचे आत्मभान जागं करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका व संपादक डॉ.विद्या बाळ यांच्या निधनाने भारतीय महिला चळवळीचे खंदे नेतृत्व हरपले.त्यांनी पेटवलेल्या वातींच्या आज लखलखत्या मशाली झालेल्या दिसतात. विद्या बाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">न्याय्य हक्कांपासून वंचित स्त्री-समूहाचे आत्मभान जागं करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका व संपादक डॉ.विद्या बाळ यांच्या निधनाने भारतीय महिला चळवळीचे खंदे नेतृत्व हरपले.त्यांनी पेटवलेल्या वातींच्या आज लखलखत्या मशाली झालेल्या दिसतात. विद्या बाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 30, 2020न्याय्य हक्कांपासून वंचित स्त्री-समूहाचे आत्मभान जागं करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका व संपादक डॉ.विद्या बाळ यांच्या निधनाने भारतीय महिला चळवळीचे खंदे नेतृत्व हरपले.त्यांनी पेटवलेल्या वातींच्या आज लखलखत्या मशाली झालेल्या दिसतात. विद्या बाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 30, 2020
विद्या बाळ या न्याय्य हक्कांपासून वंचित स्त्री-समूहाचे आत्मभान जागं करणाऱ्या लेखिका होत्या असेही पवार यावेळी म्हणाले. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे वृद्धापकाळाने आज (गुरुवारी) सकाळच्या सुमारास निधन झाले. त्यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून विद्या बाळ आजारी होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.