ETV Bharat / state

नवी मुंबईच्या विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याचा ठराव सिडकोत मंजूर - मुंबई लेटेस्ट न्यूज

दिवंगत नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्याचा ठराव सिडकोत मंजूर झाला आहे. त्यामुळे विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव दिले जाईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jun 10, 2021, 9:24 PM IST

Updated : Jun 10, 2021, 10:57 PM IST

मुंबई - नवी मुंबईतील विमानतळ सुरू होण्याआधीच नामकरणाच्या राजकारणात गुरफटलेले दिसत आहे. दिवंगत नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्याचा ठराव सिडकोत मंजूर झाला आहे. त्यामुळे विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव दिले जाईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दी.बा. पाटील यांनी स्थानिक लोकांची अनेक प्रश्न सोडवली आहेत. त्यांचा आम्हाला देखील आदर आहे. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आधीच विमानतळाला देण्यात आले आहे. त्यामुळे ते काढून आता इतर नाव देता येणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. नामकरणाबाबत दी.बा. पाटील संघर्ष समितीच्या सदस्यांसोबत मुख्यमंत्री यांची एक बैठक पार पडली आहे. अजून एक बैठक लवकरच होणार असून नामकरणाच्या मुद्यातून मार्ग निघेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच नवी मुंबईतील इतर मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी कोणत्याही प्रकल्पाला दी.बा. पाटील यांचे नाव देण्याची तयारी राज्यसरकारची असेल, असे आश्वासनही देण्यात आले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत

आरक्षण तसेच इतर महत्त्वाच्या मुद्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंठे यांनी भेट घेतली होती. या भेटी बद्दलचे इतिवृत्त राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आले. बैठकीत 12 मुद्यांवर झालेल्या चर्चेबाबत माहिती देण्यात आली असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

'महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार'

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 22 वा वर्धापन दिनानिमित्त भाषण करत असताना शिवसेना हा विश्वासार्ह पक्ष असल्याचे विधान शरद पावर यांनी केले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक हे शरद पवार असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत असल्याचा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. तर महाविकास आघाडी सरकार हे केवळ पाच वर्षे नाही तर 50 वर्ष राहील, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनीही राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर व्यक्त केला आहे.

हेही वाचा -आम्ही मृत्यूचे कोणतेही आकडे लपवले नाही; सरकार पारदर्शकपणे काम करते आहे - राजेश टोपे

Last Updated : Jun 10, 2021, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.