ETV Bharat / state

Narayan Rane : नारायण राणेंचा मनोज जरांगे पाटलांना सल्ला; म्हणाले... - जरांगे पाटलांविषयी नारायण राणेंचे मत

Narayan Rane On Manoj Jarange Patil : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पॅलेस्टाईन लोकांचं समर्थन करत त्यांना मदत करायला हवी (Maratha Reservation Issue) अशी भूमिका घेतल्याने भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करत, शरद पवार हे दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. सोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील (Jarange Patil) यांनी घटनेचा अभ्यास करावा अशी ताकीदही त्यांनी दिली आहे. (Narayan Rane Mumbai PC)

Narayan Rane On Jarange Patil
नारायण राणेंचा सल्ला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 6:37 PM IST

मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांविषयी बोलताना नारायण राणे

मुंबई : Narayan Rane On Manoj Jarange Patil : इस्राईल व पॅलेस्टाईन यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात शरद पवार यांनी पॅलेस्टाईन लोकांचं समर्थन केलं आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईलला पाठिंबा घोषित केला असताना शरद पवार यांच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे. यावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले व केंद्रात अनेक पद भूषविलेले शरद पवार दहशतवाद्यांना पाठीशी घालत आहेत का? १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यावेळेस तेरावा बॉम्बस्फोट मशीदमध्ये झाल्याची खोटी बातमी देऊन दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला होता का? असे सांगत आता तरी पवार हे तुष्टीकरण सोडून 'देश प्रथम' ही भूमिका घेणार आहेत का? असा प्रश्नही केंद्रीय मंत्री राणे यांनी उपस्थित केला.

जशास तसे उत्तर दिले जाईल : नारायण राणे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी विश्वकर्मा योजना सुरू केली व त्याचे लाखो लाभार्थी आहेत. त्या विश्वकर्मा योजनेबद्दल पवार का बोलत नाहीत? पंतप्रधान मोदी नेहमी शरद पवार यांना गुरूस्थानी मानतात; पण तुम्ही इस्त्राईलची बाजू घेतली नाही. चांगल्याला चांगल म्हणणं हा माणुसकीचा धर्म असून तो तुमच्याकडून अभिप्रेत आहे. म्हणून अशी टीका करू नका, केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशाराही नारायण राणे यांनी शरद पवारांना दिला आहे.

मराठा व कुणबी एकच नाही : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बोलताना नारायण राणे म्हणाले की, मराठा व कुणबी एकच नाही. हे अगोदर समजून घ्यायला हवे. यासाठी जरांगे पाटील यांनी घटनेचा अभ्यास करावा. मराठा आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाहीत असे म्हणतात. कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही. ९६ कुळी मराठा वेगळा आहे. म्हणून असे दाखले कुणीही घेणार नाही, असेही राणे म्हणाले. त्याचप्रमाणे ललित पाटील ड्रग्स प्रकरणात कुणालाही सोडले जाणार नाही. दोषींवर कारवाई होणारच, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरेंचे योगदान काय? : सोबतच फिल्म अभिनेता सुशांत सिंग राजपूत व त्याची सेक्रेटरी दिशा सालीयान आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच नाव असल्याचंही राणे यांनी पुन्हा ठणकावून सांगितलं आहे. तसेच आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन आमचा मूड खराब करू नका, त्यांचं महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे? असा सवालही विचारला आहे.

पंतप्रधानांच्या पुस्तकाचे प्रकाशन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कामाचा आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन ३० ऑक्टोंबरला होत आहे. हे पुस्तक शरद पवार यांना पाठवणार. परंतु, शरद पवार यांनी जी चूक केली ती मोदी करणार नाहीत, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे.

हेही वाचा:

  1. Maratha Reservation Suicide: मुंबईत सणवार येत राहतील पण...मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाची मुंबईत आत्महत्या
  2. Sanjay Raut On Devendra Fadanvis : 'मिस्टर फडणवीस हिम्मत असेल तर...', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
  3. Mumbai Pollution : मुंबई महानगराचा श्वास कोंडला! महाविकास आघाडीचा 'कृती आराखडा' लागू करा, काँग्रेसची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.