मुंबई: क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना फक्त सामूहिक विकासासाठीच का? एक-दोन इमारतींसाठी ही सवलत का नाही. आयटी पार्क जमीन वापरासंदर्भात शिंदे सरकारने एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयटी एसईझेडमधील ६० टक्के क्षेत्राचा आयटीसाठी व ४० टक्के जागेचा गैर आयटी क्षेत्रासाठी वापर करता येणार आहे. यापूर्वीच्या निर्णयामध्ये फक्त २० टक्के जागेचा वापर गैर आयटी सेवांसाठी करण्यास परवानगी होती. या निर्णयाचा फायदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर व अंबरनाथ परिसरातील उद्योगपती आणि बिल्डरांना होणार आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नमो फसवणूक योजना - शिंदे फडणवीस सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडते. सरकार फक्त घोषणा, इव्हेंट, जाहिरात यात मग्न आहे. मात्र, जनतेच्या कामकडे लक्ष नाही. घोषणाची सीमा नाही. राजकीय सभा असो कि मंत्रीमंडळ बैठक फक्त घोषणा केल्या जात आहेत.
गेल्या आठवड्यातील मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. हीदेखील घोषणापैकी एक आहे. मोदी सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानात भर टाकून दरवर्षी 12 हजार रूपये देणार असल्याचे सरकार करत आहे. ही नमो फसवणूक योजना असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे-महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले
स्वामिनाथन आयोगाचे काय झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याबाबत अश्वस्त केले होते. त्यांचे पुढे काय झाले असा सवालही पटोले यांनी विचारला. शेतकरी अवकाळी पाऊस व गारपिटीने उद्ध्वस्त झाला शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. प्रसिद्धीसाठीच सरकार घोषणा करते. प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, भरत सिंह उपस्थित होते.
हेही वाचा-
- Congress Meeting : लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठकीनंतर राज्य दौरा करणार - नाना पटोले
- Congress Meetings : लोकसभा पूर्वतयारीसाठी काँग्रेसच्या बैठका; पवार-अदानी भेटीवरून नानांचा राष्ट्रवादीला चिमटा
- Maharashtra Politics : नाना पटोले हटाव मोहिमेने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, जाणून घ्या सविस्तर