ETV Bharat / state

पालिका उभारणार 5 हजार बेड, 800 आयसीयूची 4 कोविड सेंटर

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने बेड कमी पडू नयेत म्हणून पालिका मुंबईत आणखी 4 ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारणार आहे. यामुळे आणखी 5 हजार 300 बेड तर 800 आयसीयू बेड उपलब्ध होतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

महापौर किशोरी पेडणेकर
महापौर किशोरी पेडणेकर
author img

By

Published : Apr 11, 2021, 2:59 PM IST

Updated : Apr 11, 2021, 3:37 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने बेड कमी पडू नयेत म्हणून पालिका मुंबईत आणखी 4 ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारणार आहे. यामुळे आणखी 5 हजार 300 बेड तर 800 आयसीयू बेड उपलब्ध होतील, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

माहिती देताना महापौर

कोरोना वाढला

मुंबईत मागील वर्षी मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार काही प्रमाणात कमी झाला असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. रोज 8 ते 11 हजार रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत 90 हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 15 ते 16 टक्के लक्षणे असलेले रुग्ण आहेत. या रुग्णांना बेड कमी पडू नयेत म्हणून पालिकेने खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने बिकेसी, नेस्को, दहिसर, मुलुंड, वरळी या पाच ठिकाणी मागीलवर्षी कोविड सेंटर उभारली आहेत.

5 हजार 300 बेड, 800 आयसीयू बेड

त्यानंतरही बेडची संख्या कमी पडू नये म्हणून मुंबईत 5 हजार 300 बेड तर 800 आयसीयू बेड असलेली 4 कोविड सेंटर उभारली जाणार आहेत. एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, महापालिका ही सेंटर उभारणार आहे. कांजूरमार्ग येथे एमएमआरडीए 2 हजार
बेडचे सेंटर उभारणार असून त्यात आयसीयूचे 200 बेड असणार आहे. मालाडच्या रहेजा ग्राउंडवर सिडको सेंटर उभारणार आहे. त्यात 2 हजार बेड तर 200 आयसीयू बेड असणार आहेत. चुनाभट्टी सोमय्या ग्राउंडवर म्हाडा केंद्र उभारणार आहे. त्यात 1 हजार बेड तर 200 आयसीयू बेड असणार आहेत. महालक्ष्मी येथे पालिका सेंटर उभारणार आहे. त्यात 3 हजार बेड तर 200 आयसीयू असणार आहेत. 4 ठिकाणी कोविड सेंटर उभारल्याने पालिकेला एकूण बेड 5 हजार 300 तर आयसीयूचे 800 बेड अतिरिक्त उपलब्ध होणार आहेत अशी माहिती महापौरांनी दिली.

हेही वाचा - सचिन वाझेंचे सहकारी रियाजुद्दीन काझी यांना एनआयएकडून अटक

Last Updated : Apr 11, 2021, 3:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.