मुंबई: सप्टेंबर 2021 या कालावधीमध्ये देशभर आणि जगात तालिबान यांच्या बाबत माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या सर्व पार्श्वभूमीवर देशांमध्ये देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा तालिबानी प्रवृत्तीचा असल्याचे जावेद अख्तर यांनी त्यावेळेला प्रतिक्रिया दिली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांची तुलना त्यांनी तालिबानी संघटना प्रवृत्तीच्या लोकांसोबत केली होती. देशामध्ये सर्वत्र धर्मरक्षक दुडगुस घालतात आणि ते तालिबानी प्रवृत्तीचे आहे, असे त्यांनी त्यावेळेला म्हटले होते. मात्र याबाबत मुंबईतील राम दुबे यांनी मुलुंड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती.
अर्ज त्यावेळेला फेटाळून लावला: खाजगी स्वरूपाची तक्रार दाखल केल्यामुळे मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी त्यांना कायद्यानुसार जावेद अख्तर यांना या संदर्भात समन्स जारी केला होता. या जारी केलेल्या समन्सला जावेद अख्तर यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयांमध्ये आव्हान दिले होते. त्यांच्या या आव्हान देण्याच्या अर्जाला सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रीतिकुमार घुले यांनी फेटाळून लावले आहे. या समन्सला आव्हान देणारा जावेद अख्तर यांचा अर्ज त्यावेळेला फेटाळून लावला होता. त्यामुळे मुलुंड न्यायालयामध्ये न्याय दंडाधिकारी समोर आज त्या प्रकरणात सुनावणी होती. मात्र जावेद अख्तर हे आज सुनावणीसाठी हजर राहिले नाही. त्यामुळे त्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवल्याची चर्चा अधिक होत आहे. त्यामुळेच 20 जून रोजी हजर रहा, असे मुलुंड न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी घुले यांनी आदेश बजावले.
मुंबईच्या सत्र न्यायालयांमध्ये आव्हान: खाजगी स्वरूपाची तक्रार दाखल केल्यामुळे मुंबई महानगर दंडाधिकारी यांनी त्यांना कायद्यानुसार असलेल्या अधिकारानुसार जावेद अख्तर यांना या संदर्भात समन्स जारी केला होता. या जारी केलेल्या समन्सला जावेद अख्तर यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयांमध्ये आव्हान दिले होते. त्यांच्या या आव्हान देण्याच्या अर्जाला सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती घुले यांनी फेटाळून लावले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांची तुलना त्यांनी तालिबानी संघटना प्रवृत्तीच्या लोकांसोबत केली होती. देशामध्ये सर्वत्र धर्मरक्षक दुडगुज घालतात आणि ते तालिबानी प्रवृत्तीचे आहे. असे त्यांनी त्यावेळेला म्हटले होते. त्यांच्या या विधानावर समाज माध्यमावर टीका करण्यात आली होती. तसेच प्रसार माध्यमात देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला गेला होता. मात्र याबाबत मुंबईतील राम दुबे यांनी मुलुंड या ठिकाणी तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा: BMC Lease Agreement End भूखंडांचे भाडेकरार संपले नुतनीकरणाकडे मुंबई पालिकेचे दुर्लक्ष