मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अतिरेकी आणि समाजकंटकांकडून होणाऱ्या हालचालींबाबत पोलिसांसह नागरिकही सतर्क हवेत, यासाठी शहराच्या विविध परिसरात पोलिसांचे मॉकड्रील सुरू आहे.
हेही वाचा - भारतीय राज्यघटनेची ७० वर्षे : विकास, कलम ३७० आणि सीएए..
विमानतळ, शिवाजी पार्क, मार्केट यार्ड, क्रॉफर्ड मार्केट, बांद्रा परिसरात पोलिसांकडून मॉकड्रील करण्यात येणार आहे.
शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर सुरक्षा वाढविण्यात आलेली आहे. स्मारक, मंदिर, प्रेक्षणीय स्थळांसह हॉटेल्समध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - काळजी करू नका ; आम्हीच उपचार करू, 'सामना'तील टीकेला संदीप देशपांडेंचे प्रत्युत्तर
शिवाजी पार्कमध्ये उद्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात नेतेमंडळींसह महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांबरोबरच अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदीही केली जाणार आहे.