मुंबई - अर्णब गोस्वामी विरोधात कोणताही ठोस पुरावा नाही. मग गोस्वामी यांना कोर्टाने दिलासा का देऊ नये, असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने तपायंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत.
आणखी किती वेळ अर्णब गोस्वामी यांना संशयित आरोपी म्हणून गनणार आहात, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांवर ओढले. यचिकाकर्त्याचा नाव पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात व आरोपपत्रात नसतानाही गोस्वामीवर तपासाची तलवार किती दिवस ठेवणार आहात, असा प्रश्नही उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.
काय आहे प्रकरण
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्या विरुद्ध खटला सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांच्या सध्याच्या कार्यक्षेत्रातील चौकशीचे प्रकरण हस्तांतरित करण्यासाठी वृत्तवाहिनी ‘पीडित’ म्हणून काम करण्याचा प्रयत्न करत आहे. एखाद्या वादावरून केस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. संबंधित वृत्तवाहिनी विरुद्ध कोणतीही केस नाही म्हणून याचिका रद्द करावी. दुसरीकडे संबंधित वृत्तवाहिनीकडूनही नमूद करण्यात आले की गुन्ह्यांचा तपास हा दूरसंचार आणि नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या डोमेनमध्ये आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे वर्ग केला जाणे आवश्यक आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता नियमित सुरू राहणार आहे. यावर आज उच्च न्याायलयात सुनावणी झाली आहे.
सचिन वाझे आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या तपासातील भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावर उच्च न्यायालयात सुनावणी उद्या सुनावणी होणार आहे.
हेही वाचा - मुंबई; आदेशानंतरही नागरिकांची गर्दी; राज्य सरकारसमोर मोठे आव्हान
हेही वाचा - स्कॉर्पिओ, इनोव्हा, मर्सडीज 'या' ३ कारमध्ये दडलेय वाझे प्रकरणाचे गुढ