मुंबई : दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये एका डॉक्टर महिलेचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका प्राध्यापकाला सहारा पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. बुधवारी आरोपी असलेल्या प्राध्यापक रोहित श्रीवास्तवला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने श्रीवास्तवला न्यायालयीन कोठडी सुनावली असता बुधवारीच आरोपीची जामिनावर सुटका झाली, अशी माहिती सहारा विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोविलकर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.
विनभंग केल्याचा आरोप : 24 वर्षीय डॉक्टर महिलेने 47 वर्षीय प्राध्यापकावर विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. महिलेच्या तक्रारीनंतर या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण इंडिगो एअरलाईन्सच्या विमानात बुधवारी घडले आहे. आरोपी प्राध्यापक रोहित श्रीवास्तव (वय 47) या आरोपीला पोलिसांनी अटक केली. या आरोपीला न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली होती. सहारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटणा येथे राहणाऱ्या रोहित श्रीवास्तव आणि तक्रारदार महिलेची सीट बाजूबाजूला होती. बुधवारी 26 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता हे विमान दिल्लीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, विमान मुंबईत उतरण्यापूर्वीच आरोपीने महिलेचा विनयभंग केल्याची माहिती सहारा पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपीने चुकीच्या हेतूने स्पर्श केल्याचे तक्रारदार महिलेने जबाबात नमूद केले आहे.
आरोपीविरोधात तक्रार : तक्रारदार महिलेच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने वाईट स्पर्श केल्याचे लक्षात येताच, तक्रारदार महिलेने आरोपीस विरोध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. नंतर विमानाच्या लँडिंगनंतर विमानतळावरील अधिकारी या दोघांनाही सहारा पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेव्हा आरोपी विरोधात तक्रार नोंदवण्यात आली. तसेच या महिलेचा जबाबही पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
आरोपीला अटक : आरोपी विरोधात भारतीय दंड संविधान कलम 354 आणि 354 'अ' अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती देखील वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय गोविलकर यांनी दिली आहे. त्यानंतर आरोपीला आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आरोपीला जामीन मिळाला आहे. अद्याप यावर इंडिगो एअरलाईन्सकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
हेही वाचा :