ETV Bharat / state

Mumbai Crime News : बँकेची 13 कोटी रुपयांची फसवणूक, सीएसह 9 जणांना तीन वर्षांची शिक्षा - Bank fraud in Mumbai

मुंबईत बॅंकेची फसवणूक केल्याप्रकरणी कापड कंपनीचे आठ अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट यांना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. (cheating bank of Rs 13 crore).

fraud
फसवणूक
author img

By

Published : Aug 5, 2023, 10:45 PM IST

मुंबई : राष्ट्रीयीकृत बँकेची 13 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी चार्टर्ड अकाउंटसह नऊ जणांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने एका कापड कंपनीचे आठ अधिकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जयवंत सी यादव यांनी आरोपींना 31 जुलै रोजी भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक आणि इतर संबंधित गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले.

खोट्या कागदपत्रांच्या आधारे बॅंकेकडून सवलत मिळवली : आरोपी अहमदाबादच्या मॉडर्न डेनिम लिमिटेड कंपनीच्या मुंबईतील कॉर्पोरेट कार्यालयातील उच्च अधिकारी आहेत. ही कंपनी डेनिम फॅब्रिक्सच्या उत्पादनाशी संबंधीत आहे. दोषी आरोपींनी 1994 ते 2000 च्या दरम्यान बनावट पावत्या, एक्सचेंजची बिले, लॉरी पावत्या, निर्यात ऑर्डर/करार आणि इतर कागदपत्रे तयार केली आणि ती बँक ऑफ बडोदा, भद्रा शाखा, अहमदाबाद येथे सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे बँकेने त्यांना 13.51 कोटी रुपयांची एक्सपोर्ट पॅकिंग क्रेडिट, लेटर ऑफ क्रेडिट, फॉरेन बिल सवलत आणि अंतर्देशीय बिल सवलत सुविधा दिली.

सीबीआयने गुन्हा दाखल केला : मात्र हा निधी कधीही कच्चा माल खरेदी करण्यासाठी वापरला गेला नाही. त्याऐवजी तो आठ शेल कंपन्यांत गुंतवल्या गेला. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे सरकारी वकील संदीप कुमार यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपींनी स्थापन केलेल्या या कंपन्यांनी क्रेडिट पत्रांमध्ये नमूद केलेल्या पत्त्यांवर कधीही काम केले नाही.

व्हाइट कॉलर गुन्हा : आरोपींनी नंतर बँकेसोबत वन टाइम सेटलमेंट करून 25 कोटी रुपये परत केले. या तडजोडीत आरोपींनी थकबाकीची कबुली दिली. त्यातच ते बँकेची फसवणूक करत असल्याचे आढळून आले, असे सीबीआयने म्हटले. हा व्हाइट कॉलर गुन्हा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी आयपीसी कलम 420 (फसवणूक) अंतर्गत तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

हेही वाचा :

  1. Nagpur Crime News : हत्याकांडातील आरोपीचं तरुणांना नासात नोकरीचं आमिष; १११ तरुणांना घातला साडेपाच कोटींचा गंडा
  2. Thane Crime : शेअर मार्केटच्या नावाने गुंतवणूकदारांना नऊ कोटीचा गंडा; कल्याणच्या परांजपेला शिर्डीतून घेतले ताब्यात
  3. Businessman Online Game Cheating: ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून व्यापाऱ्याची फसवणूक; बुकीच्या घरातून करोडोंचे घबाड जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.