ETV Bharat / state

Mumbai Crime : मुंबई गुन्हे शाखा ११ ने तीन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह एका आरोपीला अटक केली - Illegal weapons

मुंबई गुन्हे शाखा ११ ने तीन देशी बनावटीच्या पिस्तुलांसह एका आरोपीला अटक केली. पोलिसांना एक इसम धुळे येथुन शस्त्रे विक्रिसाठी मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अधारे पोलिसांनी सापळा रचत आरोपी रोजेश ओखेला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून सहा जिवंत काडतुस देखील जप्त करण्यात आली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Mar 15, 2023, 3:48 PM IST

पिस्तुलांसह एका आरोपीला अटक केली

मुंबई : मुंबई क्राईम ब्रँच ११ ने एका आरोपीला तीन देशी पिस्तुल आणि ६ जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. गुन्हे शाखा ११ चे पोलीस निरीक्षक सचिन गवस यांना मुंबईत कोणीतरी बेकायदेशीरपणे शस्त्रे विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोरिवली पूर्वेकडील नॅशनल पार्क गेटजवळ सापळा रचून आरोपी राजेश ओखे याला तीन देशी बनावटीचे पिस्तुल, ६ जिवंत काडतुसांसह अटक केली.

सापळा रचुन अटक : चौकशीत राजेश ओखे, धुळे येथून शस्त्रे आणून मुंबईत विकत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलिस आयुक्त विवेक फसणकर, विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस उपायुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अतिरिक्त पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चौहान, पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय, सहायक पोलिस आयुक्त काशिनाथ चौहान यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक विनायक चौहान यांच्या पथकाने वरील कारवाई केली.

दोन संशयीत ताब्यात : कम-११. गु.प्र.शा., गु. अ. विभाग, कांदिवली पश्चिम, मुंबई का श्री सचिन गवस यांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम हा धुळे येथुन गावठी कट्टे बोरीवली पूर्व, मुंबई या ठिकाणी विकण्यासाठी आला आहे. त्या अनुषंगाने प्रपोनि श्री. विनायकका ११ यांनी पथक तयार करून दोन संशयीत इसमास ताब्यात घेतले आहे. त्याची पंचासमोर झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या नायलॉनच्या पिशवीम ०३ देशी बनावटीचे पिस्टल ०६ जिवंत काडतुसे मिळून आली.

विनापरवाना शस्त्रे : सदर शस्त्रे बाळगण्याबाबत त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळुन आले. इसमाने बेकायदेशीररित्या शस्त्रे विनापरवाना जवळ बाळगल्या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे मिळून आलेल्या ३०६ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सदर आरोपीला अटक करण्यात आली असून त्यास आज दि. १४/०३/२०२३ रोजी मा. न्यायालयासमोर हजर करण्याची करण्यात येणार आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे शाखा कांदिवली करीत आहे.

हेही वाचा - Sai Risort Case: साई रीसॉर्ट प्रकरणी जयराम देशपांडे यांना 18 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी; अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.