ETV Bharat / state

मुंबईत मागील २४ तासांत कोरोनाचे 1 हजार 406 नवे रुग्ण, 42 रुग्णांचा मृत्यू - mumbai covid news

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 42 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 31 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 12 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून काल( शुक्रवारी) 1 हजार 235 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

file pic
मुंबई कोरोना
author img

By

Published : Aug 22, 2020, 12:07 AM IST

मुंबई - शहरात मागील २४ तासांत कोरोनाचे 1 हजार 406 नवे रुग्ण आढळून आले असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 34 हजार 223 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 7 हजार 353 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1235 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 08 हजार 268 झाला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 297 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 80 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवसांवर पोहचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 42 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 31 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 12 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून काल( शुक्रवारी) 1 हजार 235 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 1 लाख 08 हजार 268 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 34 हजार 223 रुग्ण असून 1 लाख 08 हजार 268 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 7 हजार 353 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 18 हजार 297 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 89 दिवस तर सरासरी दर 0.78 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 593 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 572 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 6 लाख 88 हजार 876 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.