ETV Bharat / state

राज्यातील परिस्थिती हाताळण्यास देवेंद्र फडणवीस अपयशी; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Supriya Sule : राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. राज्यात गृहखातं अस्तित्वात आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) प्रकरणातही गृहखात्याचं अपयश सिद्ध झालंय, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

Supriya Sule on Devendra Fadnavis
खासदार सुप्रिया सुळे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 7:27 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार सुप्रिया सुळे

मुंबई Supriya Sule : २६ नोव्हेबंर २००८ साली झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण झाली. या धरतीवर राजकीय क्षेत्रातून हुतात्मा यांना आदरांजली वाहण्यात आली. मुंबईतील गिरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हुतात्मा तुकाराम ओंबळे (Tukaram Omble) यांच्या स्मूर्तीस्थळाला अभिवादन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, २६/११ हा भारतातला नाही तर जगामध्ये एक काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. तुम्ही आणि आम्ही सुखरूप राहो म्हणून बलिदान दिलं अशा थोर भारताच्या सुपुत्रांना श्रद्धांजली अर्पण करते. ज्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी न करता, देशासाठी जे बलिदान दिलं. अशा या सुपुत्रांची आठवण आपल्या मनात नेहमीच असते. या सगळ्या योद्धांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार मानते, असं सुळे यांनी म्हटलंय. तसेच यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली.

हे गृहमंत्र्यांचं अपयश : राज्यात शांतता राखण्याची गृहमंत्री आणि सरकारची जबाबदारी आहे. आता लोकं मला म्हणतात की, सुप्रियाताई बालिशसारख्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पण एका आमदारावर, खासदारावर दगडफेक होते, एखाद्या महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा यंत्रणा काय करते? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. जालन्याला जेव्हा लाठीचार्ज झाला, हे सर्व गृहखात्याचं फेल्युर्रर आहे. गृहमंत्रालयाचे बॉस कोण आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मग त्यांची नैतिक जबाबदारी आहे की, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचं. पण असं होताना दिसत नाही. त्यामुळं सध्या राज्यातील वातावरण खराब होण्यास जबाबदार म्हणजे राज्य सरकार आणि गृहविभाग आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली. जर सरकारमधील लोकांवरच दगडफेक होत आहे, हे गंभीर असल्याचं देखील सुळे म्हणाल्या.

मी आरक्षणासाठी नेहमी लढले : मी संसदेत सर्व जाती, धर्मातील आरक्षणासाठी अधिक प्रश्न विचारले आहेत. आरक्षणासाठी मी सतत आग्रही आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाच्या चर्चेमध्ये कोणी भाग घेतला असेल किंवा मागणी केली असेल, मग ती मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज असेल तर तुम्ही रेकॉर्ड काढून बघा त्या खासदाराचे नाव सुप्रिया सुळे आहे, असंही सुळे म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. Supriya Sule Criticized CM : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दसरा मेळाव्यातील भाषण काल्पनिक - सुप्रिया सुळे
  2. यशवंतरावांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे शनिवारी प्रीतिसंगमावर; अजित पवार, सुप्रिया सुळेही येणार
  3. Supriya Sule : छगन भुजबळांचे आरोप, भाजपाची ऑफर अन् पहाटेचा शपथविधी... वाचा सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.